कर्तबगार नवदुर्गा - लक्ष्मी अगरवाल
महा एमटीबी   12-Oct-2018


 

या नवरात्रात MahaMTB च्या ‘कर्तबगार दुर्गा’ या उपक्रमाद्वारे समाजातील विविध क्षेत्रात आपले कर्तुत्व गाजविणाऱ्या महिलांना दिलेली ही मानवंदना...


लक्ष्मी अगरवाल, साधारण उंचीची, गोड चेहऱ्याची, एक सुंदर सामान्य मुलगी. तिचेही एका सामान्य मुलींप्रमाणे काही स्वप्ने होती. एके दिवशी तिच्याच मैत्रिणीच्या भावाने तिला मागणी घातली आणि तिने नकार दिला. तिने दिलेला नकार त्याला सहन झाला नाही. त्याने रागाच्या भरात तिचा चेहरा ऍसिड टाकून विद्रुप केला. एवढं होऊन सुद्धा रडत न बसता तिने लढाईला सुरुवात केली. तिने ऍसिड हल्ल्यात बळी ठरलेल्या इतर मुलींसाठी लढायचा विडा उचलला आणि तिच्या पराक्रमी संघर्षाला सुरुवात झाली...

 

 
 

लक्ष्मी अगरवाल हिने ‘स्टॉप ऍसिड अटॅक’ या चळवळीची तिने सुरुवात केली. यामुळे ऍसिड अटॅकमुळे दबून बसलेल्या पंखांना बळ मिळाले.

 

 

२००६ साली जनहित याचिकेद्वारे तिने कायद्यांमध्ये बरेच बदल सुचवले. उभ्या केलेल्या या चळवळीचा फायदा तिला २०१३ साली मिळाला. २०१३ रोजी ‘क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट २०१३’ संमत केला गेला.
 
ज्या अन्वये ऍसिडऍटॅकच्या गुन्हेगाराला १० वर्षे ते आजन्म कारावास (सेक्शन ३२६ A) आणि पीडिताला नुकसानभऱपाई आणि त्याचबरोबर तसा प्रयत्न करणाऱ्याला ५ ते ७ वर्ष कारावास आणि पिडीताला नुकसानभरपाई (सेक्शन ३२६ B) अश्या दोन तरतुदी केल्या गेल्या आहेत.

 


 
 
ऍसिड अटॅक पीडितांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी “छांव” या नावाची संस्था चालू केली आहे. या तर्फे अशा स्त्रियांसाठी तिने काही प्रकल्प चालवले आहेत. त्यातला एक प्रकल्प म्हणजे ‘शिरोज हँगआऊट’ जिथे ऍसिड अट्टकने पीडित असलेल्या महिला हा कॅफे चालवतात.

 


 
 
तिच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा सत्कार जागतिक पातळीवर सुद्धा नावाजला गेला होता. २०१४साली ‘इंटरनॅशनल वूमन ऑफ करेज’ या बहुमूल्य अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. हा सत्कार मिशेल ओबामा यांच्या हस्ते करण्यात आला होता.
 

 

 

 
-अभिजीत जाधव
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/