जम्मूमध्ये दोन आतंकवादी ठार
महा एमटीबी   11-Oct-2018

 
 

हंदवाडा: जम्मू- काश्मीरमधील हंदवाडा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. मृत्यू झालेल्या दहशतवाद्यांमध्ये ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’ या संघटनेचा कमांडर मन्नान बशीर वानी याचाही समावेश आहे. मन्नान हा अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी होता. त्याने पीएचडीची वाट सोडून दहशतवादी संघटनेचा रस्ता पकडला होता.

 

शाहगूंड या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली असता चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या दहशतवाद्यांमध्ये ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा कमांडर मन्नान बशीर वानी याचा समावेश आहे.

 

"पीएचडीचा विद्यार्थी असलेल्या वानीचा मृत्यू झाल्याने शेवटी आपलेच नुकसान झाले आहे. सुशिक्षित तरुणांनी दहशतवादी संघटनेत सामील होऊन दहशतवादी मार्ग स्वीकारणे दुर्दैवी आहे. सर्व राजकीय पक्षांनी याचे गांभीर्य ओळखण्याची गरज आहे." अशी प्रतिक्रिया पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/