स्वयंघोषित गुरु रामपाल दोषीच...
महा एमटीबी   11-Oct-2018


 


हरियाणा : हत्याकांड व देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू संत रामपाल याच्यासह २९ जणांना हिस्सार न्यायालयाने दोषी ठरविले. या सर्वांना या प्रकरणी १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. २०१४ साली या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. कोणतेही अनुसूचित घटना घडू नये यासाठी हिस्सार न्यायालयाच्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले होते. तर सुरक्षेसाठी १८०० सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते.

 

२००६ मध्ये रामपाल याने सत्यार्थ प्रकाशया पुस्तकातील काही मुद्द्यावर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर आर्य समाज आणि रामपाल समर्थकांमध्ये वादावादी झाली होती. या वादात ३ जणांचा मृत्यू झाला होता तर १६० जण जखमी झाले होते. तसेच १९ नोव्हेंबर २०१४ मध्ये रामपाल याच्या सतलोक आश्रमात पोलिस आणि रामपाल समर्थक यांच्यात धुमश्चक्री झाली होती. यात पाच सहा जणांचा मृत्यू झाला होता. यावरून रामपाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशा प्रकारचे वेगवेगळे गुन्हे रामपाल याच्यावर नोंदवलेले होते. त्यामुळे आता त्याला कोणती शिक्षा सुनावली जाते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/