आशियाई पॅरा गेम्समध्ये हरविंदरला सुवर्ण
महा एमटीबी   11-Oct-2018


 

 
 

जकार्ता: भारतीय तिरंदाज हरविंदर सिंग याने आशियाई पॅरा गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावले. तिरंदाजीमधले हे भारताचे पहिलेच पदक होते. त्याने चीनच्या झाओ लिकझु याचा ६-० असा पराभव केला. आशियाई पॅरा गेम्समध्ये आतापर्यंत ७ सुवर्ण, १३ रौप्य आणि १७ कांस्य पदक जमा झाली आहेत.

 

"हे पदक मी माझ्या आईला अर्पण करत आहे. मागच्याच महिन्यात तिचे निधन झाले. माझ्या यशासाठी तिने खूप तडजोडी केल्या. माझी अशी इच्छा होती कि तिने हे सुवर्ण पदक बघावं." असा हरविंदर सिंग म्हणाला. हरविंदर हा शेतकरी कुटुंबातून आला आहे. त्याने आपले शिक्षण पटियाला विद्यापीठातून घेतले. पीएचडी धारक असलेल्या हरविंदरने तिरंदाजीची सुरुवात एक छंद म्हणून केली होती. आशियाई पॅरा गेम्समध्ये भारत चांगली कामगिरी करत असून भारताच्या नावावर ३७ पदके जमा आहेत. या स्पर्धेत ३१ देशांचा समावेश आहे. भारत सध्या ९व्या क्रमांकावर आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/