कर्तबगार नवदुर्गा - इंद्रा नुयी
महा एमटीबी   11-Oct-2018


 


या नवरात्रात MahaMTB च्या कर्तबगार दुर्गाया उपक्रमाद्वारे समाजातील विविध क्षेत्रात आपले कर्तुत्व गाजविणाऱ्या महिलांना दिलेली ही मानवंदना.

 

इंद्रा नुयी या मूळच्या भारतीय मात्र लग्नानंतर त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. आपल्या बुद्धिमत्तेच्या, नेतृत्वगुणाच्या व धडाकेबाज निर्णय घेण्याच्या क्षमतेने आज जगातील सर्वात शक्तिमान महिलांमध्ये त्यांना स्थान मिळालं. त्यांनी २००६ ते २०१८ असे सलग १२ वर्ष 'पेप्सिको' कंपनीचा कार्यभार सांभाळला. त्यांच्या याच कर्तृत्वामुळे 'कर्तबगार नवदुर्गा' या आमच्या सदरात त्यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत...

 

 
 

२५ ऑक्टोबर १९५५ रोजी इंद्रा यांचा चेन्नईतील एका मध्यम वर्गीय कुटुंबात जन्म झाला.

 
 
 

कोलकातामधून मास्टर डिग्री घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील याले विद्यापीठातून पुढील शिक्षण घेतले.

 
 
 

शिक्षण घेत असताना जवळ पैसे नसल्याने त्यांनी रीसेप्शनिस्ट म्हणून देखील काम केले.

 
 
 

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये काम केले. मात्र खरी संधी त्यांना 'पेप्सिको'मध्ये मिळाली.

 
 
 

२००६ मध्ये पेप्सिकोचे चेअरमन व सीईओ रेनमुंड यांनी निवृत्ती घेऊन नूयी यांना आपला उत्तराधिकारी नेमले. 

 
 
 
 इंद्रा यांनी सीईओ पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले.
 
 
 
 
त्यांच्या याच धडाकेबाज निर्णयामुळे पेप्सिको कंपनी आज जगातील दुसऱ्या नंबरची कंपनी आहे.
 
 
 
 

अमेरिकेसमोरील आर्थिक अडचणींवर उपाय सुचविण्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये इंद्रा नुयी यांचा महत्वाचा सहभाग होता.

 
 
 

फोर्ब्सने केलेल्या सर्वेक्षणात २०१७ च्या जगातील शक्तिशाली महिलांमध्ये इंद्रा नुयी या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या होत्या.

 
 
 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या पहिल्या महिला संचालक म्हणून देखील त्या कार्यरत आहेत.

 
 
 

इंद्रा यांच्या कर्तृत्वाची दखल घेत २००७ साली केंद्र सरकारने त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरविले.

 
 
 

रीसेप्शनिस्ट ते पेप्सिको आणि 'आयसीसी'च्या संचालकपदापर्यंत इंद्रा नूयी यांनी मारलेली मजल भारतीय महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/