चंद्रघण्टा
महा एमटीबी   11-Oct-2018

 


 
 
 
पिण्डजप्रवरारुढा चण्डकोपारत्र कैर्युता।

प्रसादं तनुते मस्यम् चन्द्रघण्टेति विश्रृता॥

 

आई दुर्गाजीचे तिसऱ्या शक्तीचे नाव ‘चंद्रघंटा’ होय. नवरात्रीच्या उपासनेत तिसऱ्या दिवशी यांचेच विग्रहका पूजन आराधना (प्रार्थना) केली जाते. यांचे स्वरुप परम शांतीपूर्वक आणि कल्याणकारी असते. डोळ्यांवर घंटेच्या आकाराचे अर्थचंद्र आहे, त्यामुळेच ‘चंद्रघंटा’ नावाने संबोधले जाते. शरीरकांती सोन्याप्रमाणे असून चमकिले आहे. त्यांना दहा हात असून हातामध्ये खड्गशस्त्र तसेच बाण आदी शस्त्रविभुषित आहे. या सिंहावर आरुढ असून चेहऱ्यावरील हावभाव युद्ध करण्यास तप्तर असल्यासारखे दिसते. त्यांच्या घंटेच्या भयानक चंडध्वनिमुळे अत्याचारी, राक्षस, दैत्य, सदैव घाबरलेले असतात.

 

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आई दुर्गाच्या पूजनाला अधिक महत्त्व आहे. या दिवशी साधकाचे मन ‘मणिपूर’ चक्रात प्रविष्ट असते. आई चंद्रघंटेच्या कृपेने साधकाला अलौकिक वस्तूचे दर्शन होते. अतिशय सुगंधी अशा वासाचा अनुभव येतो. विविध प्रकारचे दिव्य अशा ध्वनीचे आवाज ऐकू येतात. हे सर्व अमूल्य क्षण साधकाला अत्यंत सावध राहावयास हवे. आई चंद्रघंटेच्या कृपाप्रसादाने साधकाचे समस्त पाय, बाधा, विघ्न नाहिसे होतात, त्याची साधना फलदायी होते. यांच्या चेहऱ्यावरील मुद्रा सदैव युद्धास तत्पर असल्यासारखी भासते. तसेच भक्तांचे दु:ख, कष्टाचे निवारण अत्यंत शीघ्रतेने करतात. वाहन सिंह असून यांचे उपासक भक्त सिंहाप्रमाणे पराक्रमी व निर्भय असतात. यांच्या घंटेच्या आवाजाने सदासर्वदा भक्तांची प्रेत बाधेपासून रक्षण करते. यांचे नामस्मरण करताच भक्तांच्या रक्षणाला घंटेचा ध्वनी निर्माण होतो.

 

दुष्टांचा नाश व खंडण करण्यास सदैव तप्तर असून यांचे रुप दर्शक भक्तांना अत्यंत सौम्य व शांतीपूर्वक असते. याची आराधना प्राप्त झाल्यास फार मोठा सद्गुण म्हणजे भक्तात शूरपणा व निर्भयता तसेच सौम्यपणा, सभ्यता, नम्रता निर्माण होते. दुर्गाजीचे तोंड, डोळे तथा संपूर्ण शरीर व गुणाची वृद्धी होते. स्वरात दिव्यता व अलौकिक माधुर्य निर्माण होते. आई दुर्गा भक्त, साधक जेथे जातील तेथे लोक त्यांना पाहून शांती व सुखाचा अनुभव करतील. साधकाच्या शरीरातून दिव्य प्रकाशयुक्त परमाणुंच्या अदृष्य किरणांचा संग होत राहतो. ही दिव्य क्रिया साधारण माणसास समजणारी नाही, दिसणारी नाही; परंतु साधक व त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना निश्चितच अनुभव झाल्याशिवाय राहात नाही. आपणास आपले मन, वचन, कर्म तसेच कार्यशास्त्रानुसार शुद्ध आचरण, संपूर्णपणे पवित्र आई चंद्रघंटेस शरण जाऊन त्यांची उपासना, आराधना करण्यास सदैव तत्पर असावयास हवे. त्यांच्या उपासनेत आपल्या सांसारिक कष्टापासून विमुक्त होऊन सहज परमपदाचे अधिकारी होऊ शकतो. त्याकरिता निरंतर पवित्र राहून सदैव खबरदारी म्हणून साधनेकडे आकृष्ट होऊन प्रयत्न केले पाहिजे. त्यांचे ध्यान आपल्या इहलोक व परलोक दोघांना परमकल्याणकारी व सद्गती प्राप्त होण्यास अनुकूलता दर्शविते.

 
 - पुरुषोत्तम काळे
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/