चिरतारुण्याची अमर्याद ‘रेखा’
महा एमटीबी   10-Oct-2018

 


 
 
 
बॉलिवुड अभिनेत्री रेखा यांचा आज ६४ वा वाढदिवस! सौंदर्य आणि रेखा यांचे १९५४ सालापासून अजोड नाते आहे. आपल्या अभिनयाने त्यांनी सिनेसृष्टीत नाव कमावलेच पण त्यांच्या दिलखेचक अदांनी त्यांनी अनेकांना घायाळ केले. आजही रेखा तितक्याच सुंदर दिसतात जितक्या त्या त्यांच्या बॉलिवुडमधील पदार्पणात दिसत होत्या. ‘खूबसूरत’ या सिनेमाचे शीर्षक जणू काही रेखांना डोळ्यासमोर ठेवूनच दिले असावे. रेखा एवढ्या चिरतरुण कशा दिसताता हा गेल्या तीन पिढ्यांना पडलेला प्रश्न आहे. अशा या चिरतरुण अभिनेत्री विषयी जाणून घेऊयात काही गोष्टी...
 
 

बर्थडे गर्ल रेखाला नाही आवडत वाढदिवस!

 
 

 

 

रेखा यांना मात्र स्वत:चा वाढदिवस साजरा करायला आवडत नाही हे क्वचितच काही जणांना माहित आहे. याचे कारण म्हणजे तामिळ अभिनेते जेमिनी गणेशन आणि तेलुगू अभिनेत्री पुष्पवल्ली यांची सुपुत्री आहे. रेखा यांच्या आईवडिलांचे लग्न झाले नसल्यामुळे जन्मापासूनच रेखा यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते.
 
 

अभिनयाची राणी

 

 
 

रेखा या त्यांच्या वयाच्या १२ व्या वयापासून अभिनय करत आहेत. रंगुला रत्नम हा त्यांचा पहिला तेलुगू सिनेमा होता. पुढे ‘दो अंजाने’ या सिनेमातून बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा हा त्यांचा पहिला सिनेमा होता. त्यानंतर रेखा यांच्या करिअरची गाडी सुसाट धावू लागली. पुढे ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘उत्सव’ यांसारखे सुपरहिट सिनेमे करत रेखा यांच्या अभिनयाचा ‘सिलसिला’ सुरूच राहिला.

 

पुरस्कार सम्राज्ञी

 

 
 

एकीकडे रेखा यांच्या करिअरने यशाचे शिखर गाठले होते तर दुसरीकडे त्यांच्यावर पुरस्कारांचा वर्षाव होत होता. अनेक फिल्मफेअर पुरस्कारांनी रेखांना गौरविण्यात आले. भारतीय सिनेमातील योगदानाबद्दल रेखा यांना २०१० मध्ये पद्मश्री हा किताब देण्यात आला.

  

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/