वीज भारनियमना विरुद्ध भुसावळ शिवसेना आक्रमक
महा एमटीबी   10-Oct-2018
 वीज भारनियमना विरुद्ध भुसावळ शिवसेना आक्रमक 
भुसावळ, १० ऑक्टोबर 
 

ऐन नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी,  व इतर सनासुदीच्या तोंडावर भुसावळभुसावळ विभागातील ४७ फिडरवर आडे आठ भारनियमन सुरु करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.  बुधवारपासून नवरात्रोत्सव सुरु झाली आहे. त्यापूर्वीच भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचे प्रातिनिधिक स्वरूपात अतिरिक्त कार्यकारी अभियंता रमण दातूनवाले यांना भुसावळ शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी त्यांच्या समोर   वापरलेल्या ऑइलचे दिवे लावण्यात आले . भारनियमन सुरू असतांना महागाईच्या काळात साध्या तेलाचे दिवे लावणेसुद्धा परवडत नाही असे शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी अतिरिक्त अभियंत्यांना सांगितले.

दरवर्षी हिंदू सणांच्या वेळेस का भारनियमन आणि कोळसा टंचाई?

सध्या उन्हाचा कडाका सर्वत्र जाणवू लागला आहे. ऑक्टोबर हिट असल्यामुळे विजेची मागणीसुध्दा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. राज्यात सुमारे 2100 मेटावॅट विज निर्मिती संच कोळशाच्या तुटवड्यामुळे बंद झाला आहे. दरवर्षी हिंदू सणांच्या वेळेस भारनियमन होते कोळसा टंचाई निर्माण होते, एकंदरीत  हिंदू सणांची थट्टा मस्करी केलेली आहे. कोळस्याचे योग्य नियोजन न केलेल्या अधिकाऱ्यावर कधीही कारवाई होत नाही. त्यांना निलंबित करावे अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी केली आहे.

नियमित वीज बिल भरून सुद्धा आमच्याच भागात भारनियमन का?

भुसावळ विभागात आधीच दुष्काळसदृष्य परिस्थिती झाली आहे. पाणी नसल्यामुळे पिके जळू लागली आहे. दुष्काळ जाहीर करावा म्हणून अनेकांनी मागणीही केली आहे. अश्या परिस्थितीत भारनियमन झाल्यास शेतकरी बांधवाला, छोट्या मोठ्या उद्योजकांना आत्महत्याच कराव्या लागतील याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणची असेल असे महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता रमण दातूनवाले यांना प्रा.धीरज पाटील यांनी सांगितले आहे.


पुढील महिन्याची वीज देयके भरू नका- बबलू बऱ्हाटे

पुढील महिन्यात भुसावळ विभागातील सर्व वीज ग्राहकांनी वीज देयके भरू नये असे आवाहन भुसावळ शिवसेनेतर्फे करीत आहोत. भारनियमन पूर्ण बंद करावे, तसेच रात्रीच्या वेळेस पूर्ण दाबाने वीज द्यावी अन्यथा शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, उपजिल्हा संघटक विलास मूळे, तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वात आंदोलन केले जाईल असा इशारा भुसावळ शिवसेनेचे दक्षिण विभाग शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी दिला.

प्रसंगी तालुका प्रमुख समाधान महाजन, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, उपतालुका प्रमुख हिरामण पाटील, शहरप्रमुख दक्षिण विभाग बबलू बऱ्हाटे, शहर प्रमुख उत्तर विभाग निलेश महाजन, महिला आघाडी जिल्हा संघटिका पूनम बऱ्हाटे, महिला आघाडी शहर संघटिका भुराबाई चव्हाण, शहर संघटक योगेश बागुल, उपशहर प्रमुख अन्सार शाह, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, उपशहर संघटक नबी पटेल, उपशहर संघटक सोनी ठाकूर, भारतीय विद्यार्थी सेना शहर प्रमुख हेमंत बऱ्हाटे, माजी शहरप्रमुख नामदेव बऱ्हाटे, नितीन पाटील, शरद जोहरे, आसिफ पटेल, फिरोज तडवी, शेख रिझवान, मोहसीन तडवी, शकील शेख, शेखर तडवी, विक्की चव्हाण, निखिल बऱ्हाटे, चेतन वाघ, जावेद जाफर, दीपक जाधव, रितेश राणे, सनी जोहरे, हर्षल पाटील, राहुल सावकारे, रवी केतवाझ, रोहित नागदेव, उपस्थित होते.