पद्मिनी कोल्हापूरे यांचे बॉलिवुडमध्ये कमबॅक
महा एमटीबी   10-Oct-2018

 

 

 
 
 
मुंबई : अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे या लवकरच बॉलिवुडमध्ये आपले पुनरागमन करणार आहेत. ८० च्या दशकात त्यांनी हिंदी सिनेसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते. त्यानंतर बराच काळ त्या सिनेसृष्टीपासून दूर होत्या. आता आशुतोष गोवारिकर यांच्या ‘पानिपत द ग्रेट बॅटल’ या ऐतिहासिक सिनेमातून त्या कमबॅक करत आहेत. या सिनेमात नानासाहेब पेशवे यांची पत्नी गोपिका बाई यांची भूमिका पद्मिनी कोल्हापूरे साकारत आहेत. तसेच या सिनेमात अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 
 
 
 
 

पद्मिनी कोल्हापुरे या बालपणीपासून अभिनय करत आल्या आहेत. सत्यम शिवम सुंदरम या सिनेमात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यांचे यशोमती मय्या से’ हे सदाबहार गाणे आजही अनेकांच्या स्मरणात आहे. ‘जमाने को दिखाना है’, ‘वो सात दिन’, ‘अनुभव’ हे त्यांचे सिनेमे ८० च्या दशकात चांगलेच गाजले. त्यानंतर २०१३ साली ‘फटा पोस्टर निकला हिरो’ या सिनेमात शाहीद कपूरच्या आईच्या भूमिकेत त्या दिसल्या होत्या. तसेच मंथन या मराठी सिनेमातही त्यांची प्रमुख भूमिका होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/