मुंबईची ओळख डबलडेकर बस बंद होणार
महा एमटीबी   10-Oct-2018
 
 

मुंबई मुंबईची ओळख अर्थाच बेस्टची डबलडेकर बस इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. मुंबईतील रस्तेदेखभालीवर होणारा अधिक खर्च यामुळे ही डबलडेकर बससेवा बंद करण्याचा निर्णय बेस्टतर्फे घेण्यात आला आहेसध्या मुंबईतील काही ठराविक मार्गावर डबलडेकर बसेस धावत आहेत. मात्रया बसेसच्या देखभालीसाठी येणारा खर्च हा मिळकतीच्या दुप्पट असल्याने या बसेस बंद करण्यात येणार असून २०२०पर्यंत ही बससेवा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

 

मुंबईची ओळख आणि आकर्षण निर्माण करण्यात डबलडेकर बसेसचा मोलाचा वाटा आहे. अनेक कलांच्या आणि चित्रपटांच्या माध्यमातून या बसेसची ओळख देशभरात झाली आहे. सध्या मुंबईतील अनेक रस्त्यांवर बेस्टच्या बसेस धावत आहेत. मात्र. सध्या मुंबईत धावणार्‍या साध्या बसेसच्या तुलनेत डबलडेकर बसेसवर होणारा खर्च हा दुपटीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे बेस्टसमोर या बसेसना सांभाळण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सुरूवातीच्या काळात मुंबईतील रस्त्यांवर १४१ डबलडेकर बसेस धावत होत्या. मात्र, त्यांची वाढती लोकप्रियता पाहून अधित बसेस खरेदी करण्यात आल्या. १९९३ साली बेस्टच्या ताफ्यात ८८२ डबलडेकर बसेस होत्या. कालांतराने रस्त्यांवरील वाढती वाहने आणि रस्त्यांची स्थिती पाहता या बसेस रस्त्यावर धावणे कठीण झाले. त्याचाच परिणाम डबलडेकर बस सेवेवर झाला. सद्यस्थिला बेस्टकडे केवळ १२० डबलडेकर बसेस उरल्या आहेत. यापैकी ७२ बसेस या २०२० च्या अखेरपर्यंत बंद करण्यात येणार आहेत. तर उर्वरित बसेस ऑक्टोबर २०२३ पर्यंत बंद करण्यात येणार आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/