कर्तबगार नवदुर्गा । मिताली राज
महा एमटीबी   10-Oct-2018

 


 
 
 
या नवरात्रात MahaMTB च्या ‘कर्तबगार दुर्गा’ या उपक्रमाद्वारे समाजातील विविध क्षेत्रात आपले कर्तुत्व गाजविणाऱ्या महिलांना दिलेली ही मानवंदना.....
 

आज आश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात घटस्थापना, नवरात्रीची पहिली माळ. पहिल्या माळेचे हे पहिले पुष्प देवी दुर्गेच्या चरणी वाहून पहिली मानवंदना देत आहोत भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिला.

 

 
 

भारतीय महिला क्रिकेट संघ म्हटले की सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहते ते कर्णधार मिताली राज हिचे नाव. महिला क्रिकेट विश्वात तिने आपले वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. क्रिकेट ही पुरुषांची मक्तेदारी असते हा समज तिने मोडून काढला. मितालीच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत आजवर तिने भारताला अनेक विजय मिळवून दिले. तिच्या या कर्तबगार कामगिरीसाठी तिला २०१५ मध्ये पद्मश्री किताब देऊन गौरविण्यात आले. स्पोर्ट्समध्ये आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या अनेक महिलांसाठी मिताली आदर्श बनली आहे.

 
 

 
 
 
    • महिलांच्या टी-२० क्रिकेट सामन्यांमध्ये २००० धावा काढणारी पहिली क्रिकेटपटू आहे.

 
 
 
 
 
 
    • महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये मितालीने ६२७३ धावा काढल्या आहेत. 

 

 
 
 
    • मिताली ही मूळची जोधपूरची असून तिच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती.


 
 
 
    •  परिस्थितीवर मात करत मितालीने आजवर स्व:बळावर यश संपादन केले आहे.

 
 
 
    • क्रीडा क्षेत्रातील मितालीच्या कामगिरीसाठी तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/