शीतपेय कंपन्या कि प्लास्टिकचा भस्मासूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2018
Total Views |
 
 

कोकाकोला, पेप्सिको, नेस्ले सर्वाधिक प्लास्टिक कचरा उत्पादक : 'ग्रीनपीस'चा अहवाल

लंडन : जगातील प्रमुख शीतपेय उत्पादक कंपन्या कोकाकोला, पेप्सिको, नेस्ले आदींमुळे मोठ्या प्रमाणावर टाकाऊ प्लास्टिकची निर्मिती होत असल्याचा अहवाल जागतिक पर्यावरण संस्था ग्रीनपिसने दिला आहे. या तिनही कंपन्यांची भारतातील विक्री पाहता ही चिंताजनक बाब आहे. ४२ देशांमध्ये २३९ प्लास्टिक कचरा निर्मूलन अभियानाअंतर्गत एकूण १ लाख ८७ हजार प्लास्टिक बाटल्या आढळल्याचा अहवाल या संस्थेने सादर केला आहे. पर्यावरणविषयक कार्यक्रमांचा गाजावाजा करणाऱ्या या बहुराष्ट्रीय कंपन्या स्वतःच प्लास्टिकचा भस्मासूर ठरत असल्याचे यावरुन दिसते. या कंपन्यांच्या उत्पादनातून कितीप्रमाणावर प्लास्टिक कचरा निर्मिती केली जाते, हे जगासमोर आणणे हा या संस्थेचा हेतू होता.

 
 

 
 
 

ग्रीनपीसच्या अहवालानुसार, कोकाकोला ही कंपनी जगातील प्रमुख शीतपेय उत्पादनांपैकी एक आहे. संस्थेने केलेल्या ४२ देशांच्या सर्वेक्षणात ४० देशांत या कंपनीने निर्मिती केलेल्या उत्पादनांचा प्लास्टिक कचरा आढळला आहे. प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येला या कंपन्या एक प्रमुख कारण असल्याचे यावरुन दिसून येते, अशी माहिती या ‘ब्रेक फ्रि फ्रॉम प्लास्टिक’ या अभियानाचे जागतिक समन्वयक वोन हेरनांडेझ यांनी दिली. बहुतांश प्लास्टिकमध्ये पॉलिस्टर आढळते. त्यात कॉफी कप, शीतपेयांच्या बाटल्या आदींमध्ये आढळतात.

 
 

 
 
 
 
ग्रीनपीसने जगभरातील प्लास्टिक कचऱ्याविरोधात मोहिम उभारली आहे. त्यानुसार प्लास्टिक कचऱ्याच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या कंपन्यांची यादी संस्थेने जाहिर केली आहे. ठंडा मतलब कोकाकोला म्हणणाऱ्या कंपनीने आपली पाळेमुळे भारतात जितक्या जलदपणे रोवली तितक्याच जलदपणे प्लास्टिक कचऱ्याचा विळखाही देशाला लागला. मार्च २०१८च्या तिमाहीत कोकाकोला कंपनीचा नफा हा १.३७ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. चीन आणि भारतात कंपनीचा विकास पाच टक्क्यांनी वाढल्याचेही आकडेवारी आहे. मात्र, याबरोबरच येत्या काळात प्लास्टिक कचऱ्याचीही समस्या वाढणार आहे. या प्रकरणी कंपनीने केलेल्या घोषणेत २०३० पर्यंत पूर्णपणे प्लास्टिक कचऱ्याचा पूर्नवापर करणार असल्याचे म्हटले आहे.
 
 

 
 
 

२०२५ पर्यंत पूर्नवापर करणार : तिन्ही कंपन्या २०२५ पर्यंत सर्व बॉटल्सचा पूर्नवापर करणार असल्याचेही म्हटले आहे. आमच्या उत्पादनाची वेष्ठनेही पूर्नवापरायोग्य असून येत्या काळात प्लास्टिक कचरा संकलित करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नेस्ले कंपनी प्लास्टिक उत्पादनांविषयी सध्या संशोधन करत असून त्यावर पर्यायी उपाय शोधन असल्याचे सांगण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@