तुम्ही किती बुरहान वनी जन्माला घातले? : ओमर अब्दुल्ला यांचा प्रश्न
 महा एमटीबी  09-Jan-2018

 
काश्मीर :  मला तुम्ही म्हटले की मी बुरहान वनी जन्माला घातले पण गेल्या दीड वर्षात तुम्ही किती बुरहान वनी जन्माला घातले? असा प्रश्न जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीर विधानसभेत व्यक्त केले. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केलेल्या वक्तव्यावर उत्तर देताना ते आज बोलत होते.
 
 
 
 
पंचायत निवडणुकीसाठी विधानसभेत वाद-विवाद झाला यावर उत्तर देत ओमर अब्दुल्ला यांनी हे वक्तव्य केले. यासंबंधी वाद सुरु असताना बुरहान वनीचा प्रश्न उपस्थित झाला. २०१६ मध्ये बुरहान वनी या दहशतवाद्याच्या खात्म्यानंतर काश्मीर येथे मोठा हिंसाचार घडला, त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
 
काश्मीरची स्थिती बघता आमदार देखील निवडणुकीसाठी तयार नाहीत, असे असताना माझ्यावर आरोप करत बसण्यापेक्षा तुमचा सत्ताधारी पक्ष काय करतोय हे आधी बघा, असा खणखणीत टोला त्यांनी यावेळी सत्ताधारी पक्षाला लगावला.