संघाचे खरे रूप बघायचे असेल तर येथे या !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |
 

 
 
ज्यांना संघ माहीत नाही, तेच संघाबद्दल जास्त बोलतात आणि लिहितात. पण ज्यांना संघाची पारख आहे ते संघाच्या केशवसृष्टीसोबत इतके तादात्म्य होऊन जातात की, त्यांच्याबद्दल फारसे बोलले आणि लिहिले जात नाही. गेल्या आठवड्यात जेव्हा नागपूरला गेलो तेव्हा स्मृती मंदिराच्या पवित्र, पुण्यस्थानाचे दर्शन घेतले आणि श्रीरामजी जोशी यांना भेटायला गेलो. त्यांची पहिली भेट १९ जून १९९७ रोजी झाली होती. त्यावेळी प्रचारक मातांवरील पाश्चजन्यच्या विशेषांकासाठी सविता श्रीराम जोशी यांची मुलाखत घेतली होती. नुकतेच त्या पुण्यशाली मातेचे निधन झाले. ज्यांची मुले प्रचारक म्हणून संघकार्यासाठी बाहेर पडली, त्या प्रचारक मातांपैकी या एक आहेत.
 
श्रीरामजी जोशी सध्या ८४ वर्षांचे आहेत. परंतु सिंहसाहसी आणि पोलादी स्वयंसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या घरी जी चर्चा झाली तो वेगळा विषय आहे. पण तेथे आबाजी थत्ते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काढण्यात आलेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा विषय निघाला. आबाजी थत्ते ऊर्फ डॉ. वासुदेव केशव थत्ते संघाचे प्रचारक होते. पू. गुरुजी आणि पू. बाळासाहेब देवरस यांचे स्वीय सहायक म्हणून त्यांनी ४५ वर्षे काम केले. ते एन.एम.ओ. अर्थात राष्ट्रीय मेडिकोज संघटनेचे संस्थापक आहेत. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संघ स्वयंसेवकांनी नागपुरात डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्था स्थापन केली व अनेक वर्षे देवेंद्र फडणवीस यासंस्थेचे अध्यक्ष होते. आणि ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळी ही जबाबदारी सुनील मनोहर यांच्या खांद्यावर आली. देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांचा मृत्यू कर्करोगाने झाला होता. संघ स्वयंसेवक शैलेश जोगळेकर यांच्या पत्नीचा मृत्यू युवावस्थेत कर्करोगानेच झाला होता. अशी शेकडो, हजारो उदाहरणे आहेत. त्यांच्या मनाने दुःख आणि शोकसंवेदनेतून एक संकल्प बांधला. कर्करोगग्रस्तांच्या उपचारांकरिता विश्वस्तरीय ख्यातीप्राप्त संस्था तयार व्हावी, ज्यात रुग्णांना कमीतकमी दरात अधिकाधिक दर्जेदार उपचार मिळावे, हा तो संकल्प होता. २० वर्षे ते या संकल्पपूर्तीसाठी झटत राहिले.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशीही त्यांनी सल्लामसलत केली. मोहनजी म्हणाले, ‘या संकल्पाची सिद्धी झालीच पाहिजे.’ स्वयंसेवकांच्या मनाने संकल्प केला तर काय साकार होऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण ठरावे. देवेंद्र, शैलेश आणि मनोहर यांच्यासह शेकडो स्वयंसेवकांच्या अहर्निश सेवाकार्याची ही परिणिती आहे. नागपुरात २६ एकर जागेवर राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूट उभी होत आहे. २०१५ मध्ये या संस्थेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला नितीन गडकरी, रतन टाटा, धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकल्पाची कल्पना साकारणारे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलेले भाषण सर्वांनी एकदा ऐकायला हवे. त्यांनी प्रारंभी शैलेश जोगळेकर, जे या प्रकल्पाचे कार्याधिकारी आहेत, त्यांचा सत्कार केला. नितीन गडकरी यांच्या भाषणाचा उल्लेख करून ते म्हणाले, ‘आमची तर अशीच इच्छा राहील की कोणालाही या रुग्णालयात उपचारासाठी यावे लागू नये. पण जर असे झालेच तर रुग्णाला अत्युच्च दर्जाचे उपचार कमीतकमी खर्चात मिळायला हवेत.’ म्हणूनच आबाजींसारख्या चिकित्सक महापुरुषाच्या नावाने ही संस्था उभारली जात आहे. या रुग्णालयासाठी २६ एकराची जागा विकत घेतली गेली. नागपूर विमानतळापासून केवळ १० किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे. या चिकित्सालयात ७०० खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. सात लाख चौरस फुटांचे एकूण बांधकाम राहणार असून, पहिल्याच वर्षी १ लाख चौरस फुटांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. १०० खाटांची व्यवस्था झाली असून, ४०० हून अधिक डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचार्‍यांसह कामाला प्रारंभ झालेला आहे. भवन निर्माणाच्या कामासोबतच रुग्णोपचारदेखील सुरू आहेत.
 
कल्पना करा... कर्करुग्णांना आजपर्यंत दिल्लीतील टाटा रुग्णालय अथवा दिल्लीतील राजीव गांधी रुग्णालयातच जावे लागायचे. दरवर्षी भारतातील ७ लक्ष कर्गरुग्णांना योग्य उपचारांअभावी अथवा योग्य वेळी रोगाची ओळख न पटल्याने मृत्यूच्या कराल दाढेत जावे लागते. ज्या उपचार संस्थांमध्ये हताश, निराश, कुंठित आणि आर्थिक बोज्याखाली दबलेल्या रुग्णाचे नातेवाईकांना विशेषतः वडील, मुलगा, आई अथवा पत्नीला भविष्य अंधःकारमय दिसत असते पण त्यांच्यासाठी रुग्णालयात थांबण्याची जागाच नसते. ते फुटपाथवर, रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये अथवा धर्मशाळांमध्ये आश्रय घेतात. जमीन विकून अथवा घर गहाण ठेवून ते आपल्या प्रियजनांना स्वस्थ ठेवण्यासाठी अथवा त्यांच्या बरे होण्यासाठी प्रयत्न करीत असतात. ते जेव्हा पंचतारांकित हॉटेलप्रमाणे चालविल्या जाणार्‍या इस्पितळांच्या चक्रात फसत असतील, तेव्हा त्यांच्यावर कोणता बाका प्रसंग येत असेल, याची कल्पनाच न केलेली बरी.
 
डॉ. हेडगेवार आणि आबाजी थत्ते यांच्या स्मृती जोपासण्यासाठी स्वयंसेवकांनी याच वेदना अंतर्मनात जपल्या आणि कॅन्सर शोध संस्थानला मूर्त रूप देण्यासाठी झटू लागले. शैलेश जोगळेकर सांगतात, ‘बाल कर्करुग्णांकरिता (पेडियाट्रिक्स) स्वतंत्र चिकित्सालय असलेले हे देशातील पहिलेच कॅन्सर इस्पितळ आहे आणि येथे प्रत्येक कर्करोगग्रस्त बालरुग्णावर निःशुल्क उपचार होणार आहेत. अशा बालरुग्णाचे पालक समृद्ध असतील तरी. अशा पालकांना योग्य वाटले तर ते मनाजोगा निधी इस्पितळाला दान देऊ शकतील. एवढेच नव्हे तर हे देशातील असे एकमेव रुग्णालय असेल जेथे प्रत्येक रुग्णाला कर्कसेवक उपलब्ध करून दिला जाईल. रुग्णाला सल्ला देणे, त्याचे मागील रेकॉर्ड घेणे, त्याच्या पूर्वीच्या चिकित्सेच्या नोंदी याशिवाय इतर कुठल्याही मदतीसाठी हा कर्क सेवक मदत करेल. शिवाय येथे असतील कर्कयोद्धा, जे कर्करोगावर संशोधन करतील. रुग्णांना नवोत्तम औषधे आणि आधुनिक पद्धतीने उपचाराचा लाभ मिळवून देतील आणि त्यांच्यावरील मानसिक तणाव कमी करण्याचा योग्य तो प्रयत्न करतील.
 
सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, रुग्ण भरती तर झाला पण, त्याला मदत करणारा कोण आहे? मग त्याला धर्मशाळा म्हणा वा चाळी, जवळच ५० अपार्टमेंट उभारले जात असून, तेथे रुग्णांचे नातेवाईक राहू शकतील. बाजारात सीटी स्कॅनसाठी २-४ हजारांपासून ७-८ हजारांपर्यंत खर्च होतात. पेट स्कॅनसाठी २२ ते २७ हजार रुपये घेतले जातात. येथे कर्करुग्णांच्या सीटी स्कॅनसाठी १२०० रुपये ते ३ हजार आणि पेट स्कॅनसाठी बारा ते पंधरा हजार रुपये आकारले जात आहेत.
 
मी डॉक्टर नाही, पण स्वयंसेवक म्हणून शैलेश जोगळेकरांच्या तोंडून हे ऐकताना माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. कितीतरी रुग्णांना डॉ. हेडगेवार आणि डॉ. आबाजी थत्ते एक नवी आशा, विश्वस्तरीय चिकित्सा आणि नवे जीवन देत आहेत. राजकारण तर एक मृगजळ आहे. देवेंद्र फडणवीस, शैलेश जोगळेकर, सतीश साल्पेकर, अधिवक्ता मनोहर असे स्वयंसेवक एकत्र आले, याला कारण ठरले डॉ. केशव बळीराम हेडगेवार. त्यांनी स्वतः मागे राहून अशा भारतीयांची निर्मिती केली, ज्यांच्यासाठी सर्वोच्च आराध्य भारत माता आहे आणि श्रेष्ठतम मार्ग आहे नरसेवा.
 
म्हणूनच जर डॉ. हेडगेवार यांना बघायचे असेल तर तुम्ही त्यांना सजीव रुपात येथे पाहू शकाल- सेवा करताना, सेवेला जीवनाची मार्ग बनवण्याची प्रेरणा देताना.
 
 
 
- तरुण विजय
 
@@AUTHORINFO_V1@@