मोदींनी आमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या पाहीजे : मेवाणी
 महा एमटीबी  09-Jan-2018

 
दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या पाहीजे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले मात्र त्यांना मिळालेल्या धक्क्यामुळे आम्हाला लक्ष्य केले जात आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. असे मत गुजरात येथील नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी याने व्यक्त केले.
 
 
 
 
दिल्ली येथे परवानगी नाकारल्यानंतर देखील जिग्नेश मेवाणी याने संसद मार्गावर हुंकार रॅली आयोजित केली. यामध्ये युवकांना त्याने गुजरात निवडणूक आणि त्यानंतर महाराष्ट्र येथे झालेल्या दगडफेकीबद्दल सांगितले. तसेच दलितांवर सरकारने मोठा अत्याचार केल्याचा आरोप देखील त्याने यावेळी महाराष्ट्र सरकारवर केला.
 
१२५ कोटी भारतीय बघतायेत की आम्हाला बोलण्याची संधी दिली जात नाही, तसेच बोलल्या नंतर आमच्यावर गुन्हा दाखल केल्या जातो, असे म्हणत त्यांनी सरकारला टोला लगावला. दिल्ली येथे सुरक्षेच्या दृष्टीने मेवाणी यांच्या हुँकार रॅलीची परवानगी नाकारण्यात आली होती, मात्र तरी देखील त्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी या रॅलीचे आयोजन केले. यावेळी पोलिस अश्रुगॅस आणि काठ्यांसह तैनात होती.