समलैंगिकता म्हणजे अनुवांशिक दोष आणि म्हणूनच गुन्हा देखील : सुब्रमण्यम स्वामी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |




 
नवी दिल्ली : समलैंगिकता हा एक अनुवांशिक दोष आहे आणि त्यामुळेच तो एक गुन्हा आहे असे विवादास्पद वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाने काल समलैंगिकतेसंदर्भातील कलम ३७७ चा पुनर्विचार आणि पुर्नपरिक्षण करणार असे जाहीर केल्यानंतर याविषयी मत मांडताना ते बोलत होते.
 

 
 
 
सर्वोच्च न्यायालय समलैंगिकतेसंदर्भातील कलम ३७७ चा पुनर्विचार आणि पुर्नपरिक्षण करणार असल्याचे मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांनी काल जाहीर केले. तीन न्यायाधीशाच्या खंडपीठाने याबाबत स्पष्ट संकेत दिले असून, केंद्र सरकारलाही या संबंधीची नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र हा एक गुन्हा आहे असे विधान स्वामी यांनी केले आहे.
 
'जगातील १६५ स्वतंत्र असलेल्या देशांपैकी ८३ देशात समलैंगिकता हा गुन्हा मानला जातो. म्हणेजच अर्धे जग हे समलैंगिकतेच्या विरोधात आहे. तसेच समलैंगिकता हा अनुवांशिक दोष असून या समुदायाने सार्वजनिक ठिकाणी त्याचे प्रदर्शन करुन नये. त्यांना आपण इतरांसारखी वर्तुणूक देऊ शकत नाही.' असे ठणठणीत मत स्वामी यांनी व्यक्त केले आहे.
 
दिल्ली उच्च न्यायालयाने २००९ साली समलैंगिकतेसंबंधी कायदा भारतात अवैध ठरवला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात एलजीबीटी समुदायाकडून याविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाचे त्यावेळेच मुख्य न्यायाधीश जी. एस. संघवी आणि न्यायाधीश एस. जे. मुखोपाध्याय यांच्या खंडपीठाने ११ डिसेंबर २०१३ला हा कायदा अवैध ठरवला. त्यानंतर आता तब्बल ५ वर्षांनंतर यावर सर्वोच्च न्यायालय पुनर्विचार करणार असे न्यायालयाने जाहीर केले होते. ३७७ कलम हे समलैंगिक संबंधावर निर्बंध आणते. कारण असे संबंध हे निसर्गनियमांच्या विरोधात असल्याचे म्हटले जाते, असे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले होते. मात्र समलैंगिक नागरिक दहशतीखाली वावरतात तसेच ते याबाबत कोणाशी खुल्या मनाने बोलू शकत नाही त्यामुळे केंद्र सरकारने याविषयी निर्णय घ्यावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
 
मात्र स्वामी यांचे हे विवादास्पद विधान समोर आल्यामुळे पुन्हा एकदा समलैंगिक संबंधांवर निर्बंध येतील का हा प्रश्न येथे उपस्थित झाला आहे.
@@AUTHORINFO_V1@@