दुःखद आणि संतापजनक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
काश्मिरला तरी एकाच देशाची सीमा जवळ आहे, पश्‍चिम बंगालच्या राजकारणात जर काही बदल करण्याचे ठरवाल तर पश्‍चिम बंगालला लागूनही इतर देशाच्या सीमा आहेत, हे लक्षात ठेवा. असे काही महिन्यांपूर्वी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी धमकीवजा विधान केले होते. अर्थात काश्मीरला लागून फक्त एकाच देशाची सीमा आहे, हे आपलं भौगोलिक ज्ञान पाजळणार्‍या ममताकडून देशाच्या सार्वभौम आणि सांस्कृतिक ज्ञानाच्या वारशाची अपेक्षा करणे म्हणजे जरा जास्तच होईल, कारण जन्माने हिंदू पण विचारांनी अंतर्बाह्य अहिंदू असलेल्या ममतांनी मतांच्या भिकेसाठी अल्पसंख्याक समुदायाचा नेहमीच अविवेकी लाळघोटेपणा केला आहे.
 
ममताकुराण सॉरी ममतापुराण लिहिण्याचं कारण हे की, ममतांनी आता तीन तलाकच्या विरोधात संरक्षणात्मक कवच असलेल्या मुस्लीम महिला विवाह संरक्षक विधायकाबद्दलही असेच विधान केले आहे. तसे पाहायला गेले तर तृणमूल काँग्रेस व ममता बॅनर्जी यांनी या विषयावर मूग गिळले होते. याबाबतचे विधेयक लोकसभेत चर्चेला आले तेव्हाही तृणमूल पक्षाच्या सदस्यांनी चर्चेत भाग घेतला नाही. मुस्लीम मतदार पक्षापासून दुरावला जाईल, ही भीती त्यांना होती.
 
 
असो, बिरभूम येथे आयोजित एका जाहीर सभेत तोंडी तलाक आणि मुस्लीम महिला विवाह संरक्षक विधायकाबद्दल ममता म्हणाल्या की, ’’या विधेयकामुळे मुस्लीम महिलांचे, तसेच त्यांच्या अधिकारांचे संरक्षण होण्याऐवजी नसत्या अडचणी उभ्या राहणार आहेत. याचा मुस्लीम समुदायाला मोठा धक्का बसेल,’’ तिहेरी तलाकमुळे अक्षरश पिचून गेलेल्या, थिजून गेलेल्या आणि शोहरने तलाक देऊ नये म्हणून मरेपर्यंत तणावयुक्त भीतीयुक्त जिणे जगणार्‍या मुस्लीम भगिनीचे दुःख ममता यांना कधीच दिसले नाही का? ममतांना अभिप्रेत असेलेला हा कोणता समुदाय आहे की, जो आपल्याच बेटीबहन यांना न्याय मिळाला तर त्यांना धक्का बसणार आहे ? विधेयकामुळे मुस्लीम समुदायाला धक्का बसेल सांगताना हे विधायक मुस्लीम भगिनीला एक माणूस म्हणून कायद्याच्या चौकटीत न्याय मिळवून देणार आहे, असे ममतांना का वाटले नाही? की मुस्लीम समुदायामध्ये असलेल्या मुस्लिम भगिनी या समाजाचा हिस्सा आहेत, असे ममताना वाटत नाही का? स्वतः स्त्री असूनही एखाद्या समुदायातील स्त्रीला न्याय मिळत असताना त्याला विरोध करणारे ममताचे विधान दुःखद आणि तेवढेच संतापजनक आहे.
 
 
 
- योगिता साळवी  
 
@@AUTHORINFO_V1@@