पहा, प्रिया बापटचा शाळेतल्या मुलीचा 'लूक'!
 महा एमटीबी  08-Jan-2018


 
प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे या दोन अभिनेत्रींची सध्या सोशल मीडिया बरोबरच इतर सर्वच ठिकाणी चर्चा चालू आहे. निमित्त आहे ते, या दोघींच्या आगामी चित्रपटाचे. 'आम्ही दोघी' या नव्या मराठी चित्रपटात प्रिया व मुक्ता आपल्याला दिसणार असून यापूर्वी चित्रपटाचे तीन पोस्टरही प्रदर्शित झाले आहेत. आज या चित्रपटाचा 'टिझर' यू ट्यूब' वर प्रसिद्ध झाला असून या चित्रपटातून प्रिया बापट आपल्याला एका शाळेतल्या मुलीच्या व्यक्तिरेखेतून दिसणार असल्याचे लक्षात येते.
 
 
सावित्री सरदेसाई असं प्रिया बापटच्या व्यक्तिरेखेचं नाव असून सावित्री शाळेत शिकणारी मध्यमवयीन मुलगी आहे, तर दुसरीकडे सावित्रीच्या घरी कामाला असणारी अमला मुक्ता बर्वेने साकारली आहे. या दोघींच्या वाटा वेगळ्या आहेत तरी पोहचण्याचे ठिकाण मात्र एक आहे, दोघींचे विचार वेगळे असले तरी म्हणणं एकच आहे, या दोघी नखशिखांत वेगळ्या आहेत पण यांना बांधणारा धागा मात्र एकच आहे. आता हा धागा नेमका कोणता आहे आणि या दोघीमध्ये कोणतं नातं आहे याची उत्सुकता रसिकांना लागून राहिली आहे.
प्रतिमा जोशी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून, पुजा छाब्रिया या निर्मात्या आहेत. या मध्ये अभिनेता कोण असणार की हा संपूर्ण चित्रपट स्त्री केंद्रीतच आहे याचा उलगडा अजून झालेला नाही. येत्या काळात याही प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना नक्की मिळतील अशी आशा आहे. १६ फेब्रुवारी २०१८ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.