भारताकडून दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता : पाक परराष्ट्र मंत्रालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2018
Total Views |

अमेरिकेचे नवे अफगाण धोरण पूर्णपणे पाक विरोधी




इस्लामाबाद : 'अमेरिकेने जारी केले नवीन अफगाण धोरण हे पूर्णपणे पाकिस्तानविरोधी असून अमेरिकेच्या या धोरणामुळे भारताकडून पाकिस्तानच्या भूमीवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ होऊ शकते' अशी प्रतिक्रिया पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाकडून आज देण्यात आली आहे. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या तेहमिना जानजूआ यांनी इस्लामाबाद येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले.

अमेरिकेने आपल्या नव्या अफगाण धोरणामध्ये भारताला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले आहे. अफगाणिस्तानमध्ये सुरक्षा स्थापन करण्यासाठी म्हणून भारताला त्यांनी या धोरणामध्ये सामील करून घेतले आहे. परंतु पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले करण्यामागे भारताचा नेहमीच छुपा हात राहिलेला आहे. त्यामुळे यापुढे अफगाणिस्तानमधून तसेच भारतीय भूमिमधून भारत सातत्याने पाकिस्तानवर हल्ले करेल', असे त्यांनी म्हटले. तसेच अमेरिकेचे अफगाण धोरण हे पूर्णपणे पाकिस्तानच्या विरोधात असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले.

 
 
पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा सध्या जगासमोर आलेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानची कानउघडणी केली होती. तसेच पाकिस्तानवर कारवाई करत अमेरिकेकडून देण्यात येणारी सर्व आर्थिक मदत देखील रोखली होती. यानंतर पाकिस्तानने अमेरिका आणि भारताला विरोध करत, दोन्ही देशांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@