अमेरिकी अंतराळवीर जॉन यंग यांचे निधन
 महा एमटीबी  07-Jan-2018

 
वॉशिंगटन : चंद्रावर पाऊल ठेवणारे अमेरिकेचे अंतराळवीर जॉन यंग यांचे नुकतेच निधन झाले. या बाबत नॅशनल अॅरोनॉटिक्स अॅण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासाने माहिती दिली. जॉन यंग यांचा आपोलोच्या पहिल्या अंतराळ शटल मोहिमेत मह्त्वाचा सहभाग होता. ते ८७ वर्षाचे होते.
 
 
 
 
माजी अंतराळवीर सहकारी जॉन यंग यांच्या दु:खद निधनाने सगळ्यांना स्तब्ध केले आहे. ते एक खरे आदर्श होते, अशा भावना त्यांचे सहकारी स्कॉट केली यांनी व्यक्त केल्या आहेत.
 
 
 
 
आज नासा आणि जगाला एका अनुभवी व तज्ज्ञ संशोधकास मुकावे लागल्याची प्रतिक्रिया नासाचे अधिकारी रॉबर्ट लाईटफूट यांनी दिली. यंग हे अमेरिकेचे असे अंतरावीळ आहेत, ज्यांनी अपोलो, जेमीनी आणि इतर काही अंतराळ कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. तसेच ६ वेळा अंतराळ यात्रा करणारे ते पहिले व्यक्ती होते.