आसियान देशांसोबत दृढ संबंध स्थापित करणे आमचा उद्देश : सुषमा स्वराज
 महा एमटीबी  07-Jan-2018

 
सिंगापूर :  आसियान देशांसोबत दृढ संबंध स्थापित करण्यावर आमचा भर आहे. सद्यस्थितीत भारतातील १६ शहरे सिंगापूरशी जोडली गेलेली आहेत. प्रस्तावित भारत-थायलंड त्रिस्तरीय महामार्ग प्रकल्पामुळे आसियान राष्ट्रांशी असणारे संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केला. प्रवासी भारतीय दिवसाच्या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित करताना त्या बोलत होत्या.
 
 
 
 
दरम्यान जकार्ता येथे काल (शनिवार ५ जानेवारी) परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते ५ व्या आसियान शिखर परिषदेचे उद्धाटन करण्यात आले. जकार्ता येथे त्यांनी भारतीय समुदायाची भेट देखील घेतली. परदेशात भारतीय नागरिकांना कुठलीही समस्या असेल तर परदेशात भारतीय दूतावास कार्यालय भारतीयांसाठी नेहमी तत्पर असेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
भारत आणि इंडोनेशियाचे सांस्कृतिक संबंध मजबूत आहेत. आंतरराष्ट्रीय पटलावर भारताला महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे भारतामध्ये अपार संधी उपलब्ध होत आहेत तसेच भविष्यात या संधी वाढणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.