पाकिस्तानकडून १४७ भारतीय मच्छीमारांची सुटका
 महा एमटीबी  07-Jan-2018
कराची : पाकिस्तान नौदलाकडून अटक करण्यात आलेल्या १४७ भारतीय मच्छीमारांची पाकिस्तानकडून आज सुटका करण्यात आली असून उद्या त्यांना भारताच्या ताब्यात देण्यात येणार आहे.


हे सर्व मच्छीमार पाकिस्तानच्या हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे मासेमारीच करत असल्याचे आढळल्यामुळे त्यांची पाकिस्तानकडून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे, असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे.


या सर्व मच्छीमारांना कराचीहून रेल्वेच्या सहाय्याने लाहोर येथे घेऊन जाण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना उद्या सकाळी वाघा बोर्डर येथे भारताच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली आहे.


गेल्या महिन्यामध्ये या सर्व मच्छीमारांना पाकिस्तानच्या सागरी सीमेमध्ये अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना कराचीतील 'मालीर जेल' या तुरुंगात ठेवण्यात आले होते व त्यांची चौकशी करण्यात आली होती. परंतु चौकशीमध्ये हे सर्व मच्छीमार निर्दोष असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांची मुक्तता करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारकडून घेण्यात आला.