'सारेगमप'च्या महाअंतिम सोहळ्यास अक्षय कुमार व अन्नू कपूर यांची उपस्थिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2018
Total Views |


 

'सारेगमप' ची जुनी परंपरा मोडत या पर्वाची सुरुवात झाली आणि महाराष्ट्रभरातून ३६ पंगेखोर निवडले गेले, त्यापैकी १२ पंगेखोर घे पंगा कर दंगा म्हणत, महाअंतिम सोहळ्यात पोहोचले आहेत. मराठी टेलिव्हिजन विश्वात प्रथमच हा महाअंतिम सोहळा वेगळ्या पद्धतीने आकार घेत आहे. उद्या म्हणजेच जानेवारीला दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत हा सोहळा लाईव्ह रंगणार आहे. यातूनच आपल्याला ह्यापर्वाचा "पंगेखोर" महाविजेता मिळणार आहे. या सोहळ्यात रवी जाधव, बेला शेंडे आणि स्वानंद किरकिरे या परीक्षकांसोबत अक्षय कुमारअन्नु कपूर यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थित असणार आहे.
 

 

सोबतच या महाअंतिम सोहळ्याला पुष्कर श्रोत्री, वैभव मांगले, मनवा नाईक, निलेश मोहरीर आणि हृषिकेश जोशी यांसारख्या कलाकारांची उपस्थित असणार आहे. जसं आपण न्यूज चॅनेलवर एक्झिट पोल बघतो त्याचप्रमाणे इथे देखिल या कलाकारांचं स्पेशल पॅनल असणार, जे आपल्याला अधूनमधून भेटत महाअंतिम सोहळ्याच्या निकालावर प्रकाश टाकणार आहेत. या आगळ्यावेगळ्या पॅनलचं सूत्रसंचालन करणार आहे प्रियदर्शन जाधव.
 
 
तर मग तयार व्हा या महाअंतिम सोहळ्याचे लाईव्ह साक्षीदार व्हायला. या स्पर्धेतील महाविजेत्याला मिळेल लाखाचे बक्षिस, त्यासोबत झी मराठीच्या मालिकेचं शीर्षक गीत गाण्याची संधी. तसेचद्वितीय क्रमांकाला मिळतील लाख रुपये, आणितृतीय क्रमांकाला मिळतील लाख रुपये, त्यासोबत झी मराठीच्या मालिकेचं शीर्षक गीत गाण्याची संधी.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@