संपूर्ण जगात भारतीय नागरिकांचे वास्तव्य : सुषमा स्वराज
 महा एमटीबी  06-Jan-2018
 
 
 
 
 
 
जकार्ता: संपूर्ण जगात भारतीय नागरिकांनी आपली ओळख निर्माण करत सगळ्या जगात भारतीय नागरिक वास्तव्य करतात असे मत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केले आहे. आज जकार्तामध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना संबोधित करतांना त्या बोलत होत्या यावेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले. सुषमा स्वराज पाच दिवसाच्या आग्नेय आशियाच्या दौऱ्यावर गेल्या आहेत. 
 
 
 
या दौऱ्यात त्यांनी जकार्ता या शहराला देखील भेट दिली. यावेळी भारतीय समुदायाशी त्यांनी संवाद साधला. परदेशात भारतीय नागरिकांना कुठलीही समस्या असेल तर परदेशात भारतीय दूतावास कार्यालय भारतीयांसाठी नेहमी तत्पर असेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
 
 
 
 
आजच्या काळात भारतात पैसा कमविण्याची साधने वाढली आहे त्यामुळे परदेशात राहणाऱ्या नागरिकांनी परदेशात देखील आपले एक पाऊल ठेवावे तसेच भारतात देखील एक पाऊल ठेवावे असा सल्ला त्यांनी यावेळी परदेशात राहणाऱ्या भारतीय जनतेला दिला. 
 
 
भारत आणि इंडोनेशियाचे सांस्कृतिक संबंध मजबूत आहेत. आंतरराष्ट्रीय पटलावर भारताला महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे भारतामध्ये अपार संधी उपलब्ध होत आहेत तसेच भविष्यात या संधी वाढणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.