आता लवकरच १० रुपयांच्या नवीन नोटाही चलनात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2018
Total Views |

 
 
 
नवी दिल्ली :  भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच १० रुपयांच्या नवीन नोटाही चलनात आणणार आहे. सध्या चलनात असलेल्या नोटांमध्ये काही बदल करुन या नव्या नोटा आणल्या जाणार आहेत. तपकीरी रंगात आणि नव्या डिझाईनसह या नवीन नोटा उपलब्ध होणार आहेत.
 
 
 
 
या नवीन नोटा महात्मा गांधींच्या नवीन सिरिजमध्ये असणार असून त्यावर आरबीआयचे गर्व्हनर डॉ. उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असणार आहे. तसेच या नव्या नोटेवर पुढील बाजूस माहात्मा गांधींचे चित्र तर मागील बाजूस देशातील सांस्कृतिक वारसा दर्शवण्यासाठी ओडीसा येथील कोणार्कचे सूर्यमंदीर दाखवले जाणार आहे.
 

नवीन नोटेची वैशिष्ट्ये -

समोरील बाजूस : 

१. देवनागरी लिपीमध्ये १० संख्येचा उल्लेख

२. केंद्रस्थानी महात्मा गांधीचे छायाचित्र

३. सूक्ष्म आकारात आरबीआय, भारत आणि १० चा उल्लेख

४. सुरक्षेच्या दृष्टिने तारेचा पातळ धागा ज्यावर आरबीआय आणि भारत याचा उल्लेख असणार आहे.

५. उजव्या बाजूस अशोक स्तंभाचे चिन्ह

६. महात्मा गांधी यांच्या छायाचित्रासोबत इलेक्ट्रोटाइप (१०) वॉटरमार्क

७. नोटेच्या वरच्या डाव्या आणि खालच्या उजव्या बाजूस लहान ते मोठे असलेले क्रमांकांचे पॅनेल


मागील बाजूस :

१. नोटेचे छपाईचे वर्ष

२. स्वच्छ भारत अभियानाचा लोगो आणि ब्रीदवाक्य

३. भाषा पॅनेल

४. कोणार्कचे सूर्यमंदीर

५. देवनागरी लिपीमध्ये १० हा क्रमांक .

 
तसेच या नोटेचा ६३ मिमि x १२३ मिमि असा आकार असणार आहे. यापूर्वी २००५ मध्ये १०च्या नोटांवर शेवटचा बदल करण्यात आला होता.
 
८ नोव्हेंबर २०१६ रोजी सरकारने १ हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या मात्र त्यानंतर २ हजार आणि ५०० रुपयांच्या नवीन नोटा नव्या रुपात चलनात आणल्या गेल्या. तसेच ऑगस्ट २०१७ मध्ये २०० रुपयांच्या व ५० रुपयांच्या नव्या नोटा आरबीआयने चनलात आणल्या होत्या.
@@AUTHORINFO_V1@@