अगं बाई! हा तर खरचं वरुणचा हुबेहूब
 महा एमटीबी  30-Jan-2018
 
 
 
 
 
अभिनेता वरुण धवणचा हुबेहूब आता सापडला आहे. चित्रपट ‘जुडवा’मध्ये वरुण धवण आपला हुबेहूब असणारा भाऊ शोधत असतो आता त्याला खरा त्याचा हुबेहूब सापडला आहे. मादाम तुसाद संग्रहालयात वरुणचा हुबेहूब मेणाचा पुतळा नुकताच प्रेक्षकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे.
 
 
 
 
आज वरुण धवन आणि त्यांचे कुटुंब अर्थात धवन कुटुंबाने या पुतळ्याला भेट दिली असून दिग्दर्शक डेविड धवन आणि वरुणची आई यांनी दोघांनी मिळून या पुतळ्यासोबत छायाचित्र काढून घेतले आहे. हाँगकाँग येथील मादाम तुसाद संग्रहालयामध्ये हा पुतळा ठेवला असून आज या पुतळ्याचे उद्घाटन वरुण धवन याच्या हस्ते करण्यात आले.
 
 
 
याबाबत वरुण याने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरून सगळ्यांचे आभार मानले तसेच त्याला आतापर्यंत प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले यामुळे तो इथपर्यंत पोहोचू शकला अशा शब्दांमध्ये त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या.