नवरदेवाची अशी एन्ट्री पाहिली काय कधी?
 महा एमटीबी  30-Jan-2018
 
 
 
 
 
 
 
 
लग्न म्हटलं की प्रत्येकालाच असं वाटत की काही तरी वेगळ्या पद्धतीने आपण सगळ्यांपुढे आगमन करावे. काही अवली नवरदेव बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने स्वत:च्या लग्नात आपला थाट मिरवून घेतात मात्र तुम्ही कधी अंडर टेकरप्रमाणे ‘एन्ट्री’ करणारा नवरदेव पाहिलाय काय?
 
 
 
wwe मधील प्रसिद्ध मुष्टियोद्धा अंडर टेकरप्रमाणे एका नवरदेवाचे चक्क लग्न मंडपात ‘एन्ट्री’ घेतली असून अंडर टेकरप्रमाणे सोन्याचा ‘बेल्ट’ देखील तो हातात घेवून आला आहे. अशा प्रकारची ‘एन्ट्री’ करणारा भूतलावरील हा पहिलाच नवरदेव ठरला असेल असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही.
 
 
काही नवरदेव घोड्यावर, बुलेटवर तर काही अवली चक्क हेलिकॉप्टरने ‘एन्ट्री’ घेतात मात्र अंडर टेकरप्रमाणे ‘एन्ट्री’ घेणारा हा पहिलाच अवली आपण पाहत असाल. फटक्यांच्या आतिषबाजीत आणि अंडर टेकरसारखा कोट परिधान करून या नवरदेवाने स्वत:च्या लग्नमंडपात अशी ‘एन्ट्री’ घेतली आहे.