‘पद्मावत’साठी रणवीरला मिळाले पहिले ‘अवॉर्ड’
 महा एमटीबी  30-Jan-2018
 
 
 
 
 
 
‘पद्मावत’ चित्रपटामध्ये सगळ्यात जास्त भाव राणी पद्मावती हिने न खाता सगळ्यात जास्त भाव अल्लाउद्दीन खिलजी खाऊन गेला आहे. कारण चहूबाजूंनी अल्लाउद्दीन खिलजीच्या कामाची प्रशंसा होतांना सध्या दिसत आहे. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी अभिनेता रणवीर सिंग याच्याकडे फुलांचा गुच्छ पाठवून त्याच्या कामाची प्रशंसा केली आहे.
 
 
 
 
 
त्यामुळे ‘मला पद्मावत चित्रपटासाठी पहिले ‘अवॉर्ड’ मिळाले आहे’ अशा शब्दांमध्ये रणवीर सिंग याने त्यांच्या ट्वीटरवरून अमिताभ बच्चन यांना धन्यवाद देत वरील वाक्य म्हटले आहे. रणवीर सिंग याने या चित्रपटात अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका साकारली असून त्याने अतिशय चोख पद्धतीने ही भूमिका पार पाडली आहे.
 
 
त्यामुळे सध्या अभिनेता शाहीद कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण या दोघांपेक्षा रणवीरची प्रशंसा जास्त होतांना दिसत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग याने क्रूर आणि विकृत काम केले असल्याने त्यांच्या कामाची प्रशंसा चक्क अमिताब बच्चन यांनी केली असल्याने मला पहिले परितोषिक मिळाले आहे असे रणवीरने म्हटले आहे.