VIDEO : चक्क अमिताभ बच्चन यांनी केलं मराठी चित्रपटाचं प्रमोशन
 महा एमटीबी  03-Jan-2018
 
 
मुंबई : मराठी चित्रपटाचे प्रमोशन हिंदी अभिनेत्यांनी करणं ही बाब आता तितकीशी नवीन राहिली नाही. अक्षय कुमार, सलमान खान, शाहरुख खान, अजय देवगण यांसारख्या मोठ्या कलाकारांनी आज पर्यंत विविध मराठी चित्रपटासाठी रसिकांना आवाहन केले आहे. आता या यादीत आणखी एक 'बिग' नावं नमूद करण्यात येईल आणि ते म्हणजे खुद्द अमिताभ बच्चन यांचं. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 'ये रे ये रे पैसा' हा मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय, आणि याच चित्रपटाचे अमिताभ यांनी प्रमोशन केले आहे.
 
काल रात्री 'ये रे ये रे पैसा'च्या संपूर्ण टीमने अमिताभ यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी अमिताभ यांनी चित्रपटाचा ट्रेलर बघितला व प्रतिक्रिया दिली. अमिताभ म्हणाले, '' या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांनी चांगलं काम केलं असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये नृत्य, गाणं, अभिनय तसेच भरघोस मनोरंजन आहे. त्यामुळे तुम्ही सर्वानी हा चित्रपट ५ जानेवारी रोजी चित्रपटगृहात जाऊन अवश्य बघा!''
 
 
संजय जाधव यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून यामध्ये संजय नार्वेकर, मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत व तेजस्विनी पंडित हे दिग्गज कलाकार पाहायला मिळतील. या आधी बच्चन यांनी स्वप्नील जोशीच्या भिकारी चित्रपटाच्या 'मुहूर्ताला' देखील उपस्थिती लावली होती.
 
 
'ये रे ये रे पैसा' मधील कलाकारांची विशेष मुलाखत
 
 
संजय जाधव

 
 
तेजस्विनी पंडित
 

 
उमेश कामत
 
 
 
सिद्धार्थ जाधव