पहा व्हिडीओ: सोनम आणि राधिकाने घेतली अक्षयची घेतली मज्जा
 महा एमटीबी  03-Jan-2018
 
 

 
 
 
 
खिलाडी अभिनेता अक्षय कुमार सध्या पॅडमॅन चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये गुंग आहे. मात्र या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी अभिनेत्री सोनम कपूर, राधिका आपटे आणि अक्षय कुमार यांनी काय काय धम्माल केली हे दाखविणारा व्हिडीओ अक्षय कुमार याने आपल्यापर्यंत पोहोचविला आहे.
 
 
 
या व्हिडीओमध्ये राधिका आणि सोनमला अक्षयने त्याचे किती चित्रपट पाहिले हे विचारले असता राधिका आपटेने मी अक्षयचे बरेच चित्रपट पाहिले असे सांगितले मात्र राधिकाला चित्रपटाचे नाव विचारले असता तिला ते आठवत नसल्याचे दिसून आले. तरी देखील मी अक्षयचे बरेच चित्रपट पाहिले असल्याचा दावा करतांना राधिका या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सोनम कपूर ही देखील यावेळी असेच काहीसे उत्तर देतांना दिसली आहे.
 
 
यावरून या दोघी माझी मस्करी करतात आणि हसतात असे काहीसे सांगणारा व्हिडीओ अक्षयने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय राधिका सोबत शुद्ध मराठी बोलतांना दिसत आहे. हेच या व्हिडीओचे खरे आकर्षण आहे. हा व्हिडिओ शेअर करत अक्षयने लिहिले आहे की, पहा माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या नायिका मला किती प्रमाणात ओळखतात? सध्या या व्हिडीओला बऱ्याच प्रमाणात सोशल मिडीयावर शेअर केले जात आहे.