'बीटिंग द रिट्रीट' कार्यक्रम आज संपन्न होणार
 महा एमटीबी  29-Jan-2018
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली: २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिवस साजरा झाल्यावर दिल्ली येथील राजपथावर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 'बीटिंग द रिट्रीट' कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आज संध्याकाळी होणार असून या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
 
दरवर्षी २६ जानेवारीला सैन्यशक्ती प्रदर्शन आणि भारताचा सांस्कृतिक वारसा याचे दिमाखात प्रदर्शन केल्यावर २९ जानेवारीला 'बीटिंग द रिट्रीट' हा कार्यक्रम साजरा केला जातो. या कार्यक्रमामध्ये नौदल, वायुदल आणि लष्कराचे सैन्य मिळून पारंपारिक बँडचे प्रदर्शन करीत असून या कार्यक्रमात वेगवेगळ्या प्रकारच्या बँडच्या धून वाजविल्या जातात.
 
दरवर्षी प्रजासत्ताक दिवसाच्या तिसऱ्या दिवशी हा कार्यक्रम साजरा केला जातो. तिन्ही दलाचे सैन्य मिळून हा कार्यक्रम सादर करीत असून हा कार्यक्रम पार पडल्यावर प्रजासत्ताक दिन संपन्न झाला असे समजले जाते. संध्याकाळी ६ वाजता बँडच्या धूनमध्ये राष्ट्रध्वज उतरविला जातो तसेच शेवटी राष्ट्रगीत गाऊन प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांचे औपचारिक समापन केले जाते.