काबुल हल्ल्यासाठी पाकिस्तानकडून साहित्यांचा पुरावा
 महा एमटीबी  29-Jan-2018

अफगाणिस्तानच्या राजदूताचा आरोप

काबुल : गेल्या शनिवारी काबुलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानकडून साहित्यांचा पुरवठा करण्यात आला होता, असा आरोप अफगाणिस्तानचे राजदूत मजीद करार टुक यांनी केला आहे. पाकिस्तानच्या लष्कराकडून अफगाणिस्तानमध्ये सक्रीय असलेल्या दहशतवादी गटांना या शस्त्रांचा पुरवठा करण्यात करण्यात येत आहे, असे देखील टुक यांनी म्हटले आहे.

गेल्या शनिवारी काबुलमधील सैनिकी प्रशिक्षण केंद्रावर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या भीषण हल्ल्यामध्ये १०३ नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला होता. तर २०० हून अधिक लोक गंभीररीत्या जखमी झाले होते. पाकिस्तानमधील हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेचा या हल्ल्यामागे हात असल्याचे बोलले जात होते. परंतु त्यासंबंधीचे कसलेही ठोस पुरावे, अफगाण सरकारच्या हाती लागलेले नाहीत.दरम्यान तपासामध्ये आढळून आलेल्या साहित्यांवरून हे सर्व साहित्य पाकिस्तानमधून आपल्याच आरोप टुक यांनी केला आहे. पाकिस्तान दहशतवादासंबंधी नेहमीच दुटप्पी भूमिका घेत आलेला आहे. आपल्या लष्कराच्या मदतीने तो नेहमी दक्षिण आशिया खंडामध्ये सक्रीय असलेल्या गटांना शस्त्र पुरवठा करतो, असे हे त्यांनी म्हटले आहे.