अबब! पाच दिवसात एवढी कमाई झाली 'पद्मावत'ची!
 महा एमटीबी  29-Jan-2018


 
संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला 'पद्मावत' हा चित्रपट गेल्या दोन महिन्यांपासून सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला होता. अखेरीस सर्व अडथळे पार करून हा चित्रपट गुरुवारी, २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. पण तरीदेखील या चित्रपटाला प्रचंड विरोध झाला असल्याने चित्रपट अधिक चालणार नाही असे वक्तव्य केले जात होते. पण आज परिस्थिती वेगळी असल्याचेच समोर येत आहे. नाही म्हणता म्हणता 'पद्मावत'ने अवघ्या पाच दिवसात शंभर कोटींचा आकडा पार केल्याचे दिसून येत आहे.
 
 
रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर या तिघांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपट अधिकृतरीत्या २५ तारखेला प्रदर्शित झाला असला तरीही त्याचे काही 'शो' २४ तारखेलाच मेट्रो सिटी मध्ये प्रदर्शित झाले होते. त्यामुळे आठवड्याच्या अखेरीस 'पद्मावत' या चित्रपटाने एकूण ११४ करोड रुपयांची कमाई केली असल्याचे समोर आले आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी यासंबंधीचे ट्विट केले आहे.
आदर्श यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, 'पद्मावत'ने पहिल्या दिवशी केवळ पाच करोड, दुसऱ्या म्हणजेच २६ जानेवारीला ३२ करोड, २७ ला २७ करोड व २८ ला ३१ करोड कमाई केली आहे. यावरून असे दिसून येते की २६ जानेवारीला 'पद्मावत'ने सर्वाधिक ३२ करोडची कमाई केली आहे.अक्षय कुमारने त्याचा 'पॅडमॅन' हा चित्रपट 'पद्मावत' मुळे पुढे ढकलला आहे. या निर्णयाचा संजय लीला भन्साळी याला नक्कीच फायदा झाल्याचे दिसून येते. ९ फेब्रुवारी पर्यंत कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित होत नसल्याने 'पद्मावत'च्या कमाईची उड्डाण आणखी वाढतच जातील.