‘रणवीरची खलीबली’
 महा एमटीबी  29-Jan-2018
 
 
 
 
 
पद्मावत चित्रपटातील तिसरे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘खलीबली’ असे या गाण्याचे बोल असून अभिनेता रणवीर सिंग याने या गाण्यात हुबेहूब अल्लाउद्दीन खिलजीची व्यक्तिरेखा साकारली आहे असे दिसून येत आहे. या गाण्यातील रणवीर सिंगचे हावभाव आणि नृत्य अभिव्यक्ती पाहून सगळ्यांचेच मन हादरून गेले आहे.
 
 
 
 
विक्रुत आणि क्रूर हे शब्द देखील कमी पडतील अशा प्रकारचा नृत्य अभिनय रणवीरने या गाण्यात केला आहे. मात्र या गाण्यातील अभिनय पाहून रणवीर सिंग हा हाडाचा अभिनेता आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पद्मावत चित्रपटातील हे तिसरे गाणे असून हे देखील काही काळातच सोशल मिडीयावर खूप शेअर केले जात आहे. 
 
 
 
या गाण्यात रणवीरचा आक्रमक आणि क्रूर चेहरा सगळ्यांचे लक्ष वेधत असून प्रेक्षकांना हे गाणे खूप आवडत आहे. रणवीरने एक तासापूर्वी हे गाणे सोशल मिडीयावर शेअर केले असून आतापर्यंत २०९,१८१ प्रेक्षकांनी हे गाणे पाहिले आहे. पद्मावत चित्रपट प्रदर्शित होवून पाच दिवस झाले असून आतापर्यंत या चित्रपटाने ११४ कोटींचा आकडा पार केला आहे.