पंजाब केसरी ...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jan-2018
Total Views |
पंजाब केसरी ...!
 
लोकप्रिय पंजाब केसरी म्हणून ओळखले जाणारे लाला लाजपत राय भारताचे प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक होते. लाला लाजपत राय भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या तीन प्रमुख हिंदू राष्ट्रवादी नेत्यांपैकी एक होते. त्यांचा जन्म २८ जानेवारी १८६५ रोजी झाला. अलाहाबाद मधील १८८८ च्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सत्रात त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी सदस्य होते, ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यसाठी आपले जीवन समर्पित केले. एक प्रखर स्वातंत्र्य सेनान्यासह ते एक उत्तम लेखक देखील होते. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज मध्ये लाल लाजपत राय जखमी झाले व काही दिवसांतच त्यांचे निधन झाले. 
 
@@AUTHORINFO_V1@@