मीशाच्या हा गोड फोटो बघितला का?
 महा एमटीबी  28-Jan-2018

 
मुंबई : सिनेसृष्टीत 'स्टारकिड्स' विषयी जितकी चर्चा होते, तितकी कदाचित या सिने तारकांबद्दल देखील होत नसेल. त्यामुळे सिने तारे तारकांपेक्षा त्यांच्या चिमुकल्यांचीच फॅनफॉलोइंग जास्त आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या चाहत्यांसाठी आज शाहिद कपूर याने आपली कन्या मीशा सोबत एक अत्यंत गोड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
 
 
 
 
यामध्ये शाहिदची कन्या अत्यंत निरागस आणि गोड दिसतेय. 'रविवारची सकाळ' असे लिहीत शाहिदने हा फोटो शेअर केला आहे. याआधी देखील मीरा कपूर आणि शाहिदने आपल्या गोड कन्येचा फोटो अनेकदा टाकला आहे. त्यामुळे मीशा आता सगळ्यांचीच लाडकी 'स्टारकिड' झाली आहे.
 
१० लाख लोकांपेक्षा अधिक लोकांनी या फोटोला पसंती दर्शविली आहे. तर यावर १० हजार लोकांनी प्रतिक्रिया दिली आहे.