'जागरूक मतदार हाच लोकशाहीचा बळकट आधार'
 महा एमटीबी  26-Jan-2018

जिल्हाधिकारी आस्त‍िक कुमार पाण्डेय यांचे प्रतिपादनअकोला : भारताची लोकशाही ही अत्यंत मजबूत असून येत्या काळात जागतीक स्पर्धेत टिकून राहावयाचे असेल तर भारतीय संविधानावर आधारीत लोकशाहीचे मुल्य जोपासून भारतातील युवा मतदारांनी आपल्या देशाची लोकशाही अधिक सुदृढ करावी. कारण जागरूक मतदार हाच लोकशाहीचा खरा आधार आहे,' असे वक्तव्य जिल्हाधिकारी आस्त‍िक कुमार पाण्डेय यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

अनेक देशानी आपला विकास करतांना आपल्या नैतिक मुल्यांना तिलांजली दिली आहे, परंतु भारताने आपली लोकशाही आजपर्यंत टिकवत प्रगती केली आहे. हेच आपल्या देशाचे बळकट स्थान आहे. मागील ७० वर्षात आपली लोकशाही प्रगल्भ झाली असून यासाठी आपल्या लोकप्रतिनिधीचे चांगले कार्य केले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगीतले. तसेच लोकप्रतिनिधी शिक्षित असो वा अशिक्षीत असो परंतु देशातील मतदार हा मात्र सुशिक्षीत असावा आणि उमेदवाराचा पूर्ण अभ्यास करूनच त्याला मत द्यावे, असे मत जिल्हाधिकारी पांण्डेय यांनी यावेळी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना देश, लोकशाही, राजकीय पक्ष, संविधान व लोकशाही प्रणाली या शब्दांची व्याख्या शिक्षकांनी समजावून सांगावी, यासाठी शाळेत चर्चासत्राचे आयोजन करावे, असे ते शेवटी म्हणाले.