प्रसिद्ध बालकलाकार प्रफुल्ल भालेरावचे निधन
 महा एमटीबी  22-Jan-2018

 
मुंबई :  कुंकू या मराठी मालिकेतून उदयाला आलेल्या अभिनेता प्रफुल्ल भालेरावचे रेल्वे अपघातात निधन झाले. या बातमीने मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीत खळबळ माजली. इतक्या कमी वयाच्या अभिनेत्याच्या या दु:खद निधनाने मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. पहाटे ४.३० वाजता हा अपघात घडला. 
 
 
 
 
नुकत्याच आलेल्या बारायण या चित्रपटात देखील प्रफुल्लने भूमिका साकारली होती. त्याशिवाय कलर्स वाहिनीवरील 'तू माझा सांगती', आवाज- ज्योतिबा फुले, 'स्टार प्रवाह'वरील नकुशी या मालिकांमधील त्याच्या व्यक्तिरेखा देखील खूप प्रसिद्ध झाल्या होत्या.
 
त्याच्या अकाली मृत्यूने अभिनय क्षेत्राने एक मोठा कलाकार गमावला अशा भावना कुंकू या चित्रपटातील त्याची सहकलाकार मृण्मयी देशपांडे हिने व्यक्त केल्या आहेत. त्याच्या अभिनयाची वाटचाल आता कुठे सुरु झाली असताना त्याचे अचानक जाणे अत्यंत दु:खद आहे. मात्र हा अपघात कसा झाला या बाबत अद्याप माहिती मिळाली नाही.