अक्षय कुमार का फडकवतोय 'एबीव्हीपी'चा झेंडा?
 महा एमटीबी  22-Jan-2018

 
अक्षय कुमारचे देश प्रेम आपण सर्वच जण जाणून आहोत. गेल्या काही वर्षातल्या त्याच्या चित्रपटातून त्यांनी ते वेळोवेळी दाखवून दिले आहे. एवढाच काय काल पर्यंत एक कलाकार म्हणून मोठा असणारा अक्षय 'पद्मावत'साठी स्वतःचा 'पॅडमॅन' हा चित्रपट पुढे ढकलला. आता आज तो दिल्लीमध्ये आहे. आणि गेल्या काही तासांपासून त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेला एक फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोत अक्षय कुमार 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे'चा (एबीव्हीपी) झेंडा फडकवताना दिसत आहे. पण या फोटोवरील कॅप्शन पाहिल्यावर असे लक्षात येते की तो दिल्ली विद्यापीठात 'पॅडमॅन' या त्याच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.
 
 
 
दिल्ली विद्यापीठ व एबीव्हीपी यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यापीठात 'वूमन्स मॅरेथॉन'चे आयोजन करण्यात आले होते. अक्षयने 'एबीव्हीपी' झेंडा फडकावून या 'मॅरेथॉन'ला सुरुवात झाल्याचे घोषित केले. सॅनेटरी नॅपकिन्स करमुक्त करण्यासाठी तसेच महिला सक्षमीकरणासाठी ही 'मॅरेथॉन' स्पर्धा घेण्यात आली होती.
 
 
या स्पर्धेअंतर्गत 'एबीव्हीपी' च्या कार्यकर्त्यांनी महिलांना सॅनेटरी नॅपकिन्सचे मोफत वाटप केले. या कार्यक्रमात 'एबीव्हीपी'चे संयुक्त सचिव श्रीनिवास यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.