‘पद्मावत’ चित्रपटाचे नवे दोन डायलॉग प्रोमो प्रदर्शित
 महा एमटीबी  20-Jan-2018
 
 
 
 
 
 
वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘पद्मावत’ चित्रपटाचे नवे दोन डायलॉग प्रोमो प्रदर्शित करण्यात आले आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोन हिने हे दोन्ही डायलॉग प्रोमो तिच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. या डायलॉग प्रोमोमध्ये दीपिका पदुकोन अतिशय सुंदर दिसली आहे. नुकताच पद्मावत चित्रपटाचा वाद थंड झाला असून आता शेवटी बऱ्याच महिन्यांनी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.
 
 
 
येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित करण्यात येणार आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा सगळ्यात जास्त वादाच्या कचाट्यात सापडलेला हा चित्रपट असून आता या चित्रपटाचे जोरदार ‘प्रमोशन’ केले जात आहे. म्हणून दीपिकाने पुन्हा दोन नवे डायलॉग प्रोमो शेअर करून या चित्रपटाची उत्सुकता वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.