शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : काश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018   
Total Views |

 
"है काश के हम होश में अब आने ना पाये.." हे गाणं आठवतंय. या गाण्यातला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे काश.. खरंच असं झालं असतं तर तसं झालं असतं तर असे म्हणताना हिंदीत त्याला एक सुंदर शब्द आहे काश... काश म्हणजे पश्चाताप... ही कथा याच पश्चातापावर आधारित आहे. ही कथा आहे रॉनी नावाच्या एका मुलाची. 
 
रॉनी आणि अदिती ३ वर्षांपासून मित्र - मैत्रीण. घट्ट, एकमेकांशिवाय कदाचित त्यांचे पान हालतही नसावे. असे हे रॉनी आणि अदिती एक दिवस संध्याकाळी पब मध्ये भेटतात, रॉनीचे लक्ष टीव्हीतल्या खेळात लागलेले. आणि अदिती त्याला आठवण करुन देते की आजच्याच दिवशी तीन वर्षांआधी ते पहिल्यांदा भेटले होते. मात्र रॉनी पार विसरलेला असतो. अदिती थोडी हिरमुसते. इतक्यात तिला एक फोन येतो, आणि ती बाहेर जाते, आणि रॉनीला भेटतो काशीराम.
 
 
 
 
कोण होता हा काशीराम ज्याला रॉनीची इत्थंभूत माहिती आहे. ज्याला रॉनीच्या आवडत्या कलाकारापासून आवडत्यारंगापर्यंत सगळंच माहिती आहे. आणि तो असं काय सांगतो की रॉनी शेवटी अदितीला मागणी घालतो, आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी. काशीरामचे बोलणे ऐकून रॉनी घाबरतो, त्याला घाम फुटतो की आपल्याबद्दल सगळे माहिती असणारा हा मनुष्य कोण? तुम्हालाही जाणून घेण्याची उत्सुकता असेलच ना? त्यासाठी बघा हा लघुपट.
 
या लघुपटात कोणी नामवंत कलाकार नाही, किंवा कथाही साधीच आहे, म्हणजे आपण पुढे काय होणार हे ओळखू शकू अशी. या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे राजेंद्र सिंह पुल्लर याने तर यामध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत अमन गुप्ता, दीपेन पटेल, अंकिता गोराया, रोनिला बसनेत आणि श्रीचंद्रा एस, एंथोनी यांनी. या लघुपटात संदेश चांगला देण्यात आला आहे.
 
आयुष्यात जर एकटे जगायचे नसेल आणि "काश" म्हणून आयुष्यभर पश्चाताप करायचा नसेल तर न घाबरता एकदा काय तो निर्णय घ्यावाच लागतो नाही का?

 
- निहारिका पोळ  
@@AUTHORINFO_V1@@