महिलांना तंत्रज्ञान साक्षर बनवणार ‘नारी’
 महा एमटीबी  02-Jan-2018
 
 
 
 
 
नवी दिल्ली : आज नवी दिल्ली येथे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी ‘नारी’ या पोर्टलचे उद्घाटन केले. महिलांसाठी असलेले हे पोर्टल देशातील महिलांना तंत्रज्ञान साक्षर बनायला मदत करेल तसेच ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देईल. ‘नॅशनल रिपोझिटरी ऑफ इंफॉर्मेशन फॉर वूमन’ असे या नारी पोर्टलचे संपूर्ण नाव आहे.
 
 
 
 
 
 
 
 
सुरक्षा, आरोग्य, शिक्षण, पारपत्र, सामाजिक मदत यासंबंधी महिलांना काही महत्वाच्या समस्या असतील तर या पोर्टलच्या माध्यमातून महिला मदत मागू शकतात तसेच एकमेकींना मदत करू देखील शकतात. पारपत्र, आधार ओळखपत्र हे मिळविण्यासाठी महिला या पोर्टलवर नोंद देखील करू शकतात. 
 
 
 
 
 
महिला व बालकल्याण मंत्रालयद्वारे हे पोर्टल काढण्यात आले आहे. आर्थिक, आरोग्य, अत्याचार याविषयी महिला या पोर्टलवर आपली समस्या सांगू शकतात.