'पॅडमॅन' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबली
 महा एमटीबी  19-Jan-2018
 
 
 
 
 
मुंबई: महिलांच्या आरोग्याशी निगडीत असणारा चित्रपट 'पॅडमॅन'च्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच पुढे ढकलण्यात आली आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी आज ही माहिती मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. ‘पद्मावत’ हा चित्रपट उशिरा प्रदर्शित होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे असे अक्षयने या परिषदेत सांगितले आहे.
 
 
 
 
 
वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘पद्मावत’ हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत असल्याने ‘पॅडमॅन’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबवण्यात आली असल्याची माहिती अक्षय कुमार आणि संजय लीला भन्साळी यांनी दिली आहे. बऱ्याच महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात ‘पद्मावत’ हा अडकला असल्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित होत नव्हती.
 
 
 
 
 
आता ‘पद्मावत’ या चित्रपटच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली, मात्र याच दिवशी अक्षय कुमारचा चित्रपट ‘पॅडमॅन’ हा देखील प्रदर्शित होणार असल्याने ‘अक्षयला संजय लीला भन्साळी यांनी तुझा चित्रपट पुढे घेवू शकतो काय?’ असे विचारले असता अक्षय कुमार याने त्याचा चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रदर्शित करण्याचे ठरवले आणि ‘पद्मावत’ या चित्रपटाला मार्ग मोकळा करून दिला.
 
 
 
 
 
 
या सगळ्या निर्णयासाठी संजय लीला भन्साळी यांनी अक्षय कुमारला खूप खूप धन्यवाद दिले आहे. तसेच अभिनेता शाहीद कपूर ,अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोन यांनी देखील अक्षय कुमारचे मनापासून आभार मानले आहे.