अरेच्चा षटकार..... नाही हे तर लिंबू आहे.. बघा सचिनचा हा व्हिडियो
 महा एमटीबी  18-Jan-2018

 
आपल्या फलंदाजीने विरुद्ध संघाच्या तोंडचे पाणी पळवणारा सचिन त्याच्या खेळामुळे तर नेहमीच प्रसिद्ध राहिला आहे, मात्र सध्या तो समाज माध्यमांवरही खूप सक्रीय असतो, त्यामुळे त्याच्या अनेक फोटो आणि व्हिडियो विषयी या माध्यमांवर चर्चा होते, त्याचा असाच एक व्हिडियो प्रसिद्ध झाला आहे, ज्यामध्ये तो लिंबू तोडताना दिसत आहे.
 
 
 
 
 
त्याने इंस्टाग्रामवर हा व्हिडियो शेअर करत लिहिले आहे, "अरेच्चा शटकार... न्ही हे तर लिंबू आहे." त्याच्या या हासवणाऱ्या पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांना मात्र मजा येत आहे. तसेच यामुळे सचिनचे एक वेगळे रूप देखील दिसून येत आहे.
 
याआधी देखील सचिनने अनेकदा असे व्हिडियो पोस्ट केले आहे. यापैकी एका व्हिडियोमध्ये तो दुचाकीवर मागे बसलेल्या मुलीला हेलमेट घालण्याचे आवाहन करताना दिसला आहे. त्यामुळे सचिनच्या या व्हिडियोजमुळे चाहत्यांचा मात्र छान विरंगुळा होत आहे.