एस. बालाचंदर...!
 महा एमटीबी  18-Jan-2018
एस. बालाचंदर...!
 
सुंदरम बालाचंदर यांना एस. बालचंदर ही म्हंटले जायचे. एस. बालचंदर एक बहुमुखी व्यक्तिमत्व होते ,तमिळ सिनेमा, म्युझिक, डान्स फॉरमॅट्ससह अनेक क्षेत्रात त्यांनी काम केले. ते एक कुशल वीणा वादक व एक उत्तम गायक आणि संगीतकार होते. १८ जानेवारी १९२७ रोजी मद्रासमध्ये जन्मलेल्या कर्नाटक शास्त्रीय संगीतातील डॉ. एस. बालचंदर हे प्रमुख व्यक्तिमत्त्व होते.१५ एप्रिल १९९० साली भिलाई येथे त्यांचा मृत्यू झाला, तो कर्नाटक संगीतासाठी एक मोठा धक्का होता.