अखेर पद्मावतचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाची साथ
 महा एमटीबी  18-Jan-2018 
नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून अडचणींना सामोरे जात असलेला पद्मावत या चित्रपटाचा मार्ग मोकळा झाला आहे. देशातील सर्वच राज्यांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करता येणार आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानी दिली असून ज्या राज्यांमध्ये पद्मावत वर लावण्यात आलेली बंदी त्वरित काढण्यात यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या सिनेमाच्या निर्मात्यांना आता दिलासा मिळाला आहे. 
 
ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी या संदर्भात निर्मात्यांची बाजू मांडली. पद्मावत मधील अनेक दृष्यामविषयी आक्षेप घेत करणी सेनेने तसेच इतर काही संघटनांनी यावर बंदी घातली होती. राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि हरियाणा या राज्यांनी या चित्रपटांवर बंदी घातली होती, मात्र आता ही बंदी काढण्यात यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 
 
या संपूर्ण प्रकरणामुळे या चित्रपटाचे नाव 'पद्मावती' वरून 'पद्मावत' करण्यात आले होते. तरी देखील या सिनेमा मागे लागलेल्या अडचणी चाही थांबल्या नाहीत. 
४ राज्यांमध्ये या चित्रपटांवर बंदी घातल्यामुळे त्याविरोधात निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर सिनेमाच्या सर्व निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान आता हा चित्रपट सर्व राज्यांमध्ये २५ जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे