पद्मावत प्रदर्शित झाल्यास देशातल्या हिंसाचाराला सर्वोच्च न्यायालय जबाबदार : करणी सेना
 महा एमटीबी  18-Jan-2018

 
पद्मावत चित्रपट आता सर्व राज्यांमध्ये प्रदर्शित करण्यात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. तसेच ज्या राज्यांनी या चित्रपटावर बंदी लावली होती, त्या राज्यांना ही बंदी त्वरित काढण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या निर्णयाचा विरोध करत करणी सेनेने, " हा चित्रपट प्रदर्शित झाल्यात देशात हिंसाचार झाला तर त्यासाठी सर्वोच्च न्यायालय जबाबदार असेल." असे वक्तव्य केले आहे.
 
 
 
 
 
तसेच देशात इतके खटले सुरु आहेत, मात्र पद्मावतच्या निर्मत्यांसाठी एका दिवसात निकाल लागतो असे का? असा प्रश्न देखील करणी सेनेने उपस्थित केला आहे. "पद्मावत चित्रपटावर चार राज्य सरकारांनी बंदी घतल्यानंतर ती उठविण्याचा सर्वोच्च न्यायालयाला कोणताही हक्क नाही. जर पद्मावत चित्रपट प्रदर्शित झाला, तर त्यानंतर देशभरात होणाऱ्या हिंसेला सर्वोच्च न्यायालयच जबाबदार असेल." असा इशारा राष्ट्रीय करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव जीवन सिंह सोलंकी यांनी दिला आहे.
 
देशात कोणत्याही चित्रपटगृहात पद्मावत सिनेमा प्रदर्शित झाला तर ते चित्रपटगृह जाळण्यात येईल, असा संदेश देखील करणी सेनेतर्फे देण्यात आला आहे.