माधुरीच्या आईची तिला खास भेट
 महा एमटीबी  18-Jan-2018

 
मुंबई : रुपेरी पडद्यावर ९० चे दशक गाजवणारी, आपल्या सुंदर अभिनयामुळे आणि नृत्यामुळे चाहत्यांना वेड लावणारी माधुरी दीक्षित नेने तिच्या आगामी काळात येणाऱ्या मराठी चित्रपटामुळे चर्चेत आहे, मात्र आता चर्चा होत आहे तिला मिळालेल्या एका खास भेटवस्तुची. ही भेटवस्तु तिला कुणी अजून नाही तर तिच्या आईने दिली आहे. तिच्या ट्विटर खात्याच्या माध्यमातून ही भेटवस्तु तिच्या चाहत्यांना दाखविली आहे.
 
 
सगळ्यांच्या आवडत्या "धकधक गर्ल"साठी तिच्या आईने एक खास स्कार्फ विणला आहे. हाच याचा फोटो तिने ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. ‘माझ्या ८५ वर्षांच्या आईने हा सुंदर स्कार्फ खास माझ्यासाठी तयार केला आहे. आयुष्यातील तिचा हा उत्साह खरंच प्रेरणादायी आहे’, असे म्हणत तिने आईच्या प्रेमाला पावती दिली आहे.
 
तिचा हा फोटो समाज माध्यमांवर सध्या चर्चेत आहे. तसेच तिच्या आगामी मराठी चित्रपट "बकेट लिस्ट" विषयी देखील समाज माध्यमांवर चर्चा रंगली आहे. तिच्या पोस्टला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून चाहत्यांना तिच्या पहिल्या मराठी चित्रपटाविषयी खूप उत्सुकता आहे.