पद्मावत : चार राज्यांमध्ये बंदी लागल्यानंतर निर्मात्यांची सर्वोच्च न्यायालयाकडे धाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |

 
नवी दिल्ली :  अखेर नाव बदललल्यानंचर २५ जानेवारी रोजी पद्मावत हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. मात्र ४ राज्यांनी या चित्रपटावर बंदी घातल्यामुळे निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली आहे. राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेश आणि गुजरात येथे या चित्रपटांवर बंदी घातल्यामुळे चित्रपटाला तोटा होवू शकतो, त्यामुळे निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली आहे.
 
हरियाणा राज्यात पद्मावत हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही अशी माहिती नुकतीच हरियाणा सरकारने जाहीर केली आहे. काल हरियाणा येथे राज्यसरकारच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 
दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांचा सगळ्यात वादग्रस्त चित्रपट ‘पद्मावत’ हा ठरला आहे. ‘पद्मावती’ हे नाव बदलवून या चित्रपटाचे ‘पद्मावत’ नाव ठेवण्यात आले तसेच ‘घुमर’ गाणे देखील या चित्रपटातून वगळण्यात आले, मात्र इतके सगळे करून देखील या चित्रपटाचा मार्ग मोकळा झालेला नाही.
 
१६ व्या शतकातील सुफी कवी मलिक मोहम्मद जयसी यांच्या प्रसिद्ध 'पद्मावत' या काव्यावर आधारित या चित्रपटांला सुरुवातीपासूनच टीकेला सामोरे जावे लागले. मात्र आता अखेर अनेक अडचणींनंतर तसेच प्रेक्षकांच्या खूप वाट पाहण्यानंतर पद्मावत येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@