पतंजली उत्पादने आता ऑनलाईन उपलब्ध
 महा एमटीबी  16-Jan-2018

 
योगगुरू स्वामी रामदेव यांची पतंजली उत्पादने आता ऑनलाईन देखील उपलब्ध झाली आहेत. वाढत्या बाजारपेठ ट्रेंड नुसार पतंजलीने देखील ई-कॉमर्स पोर्टलवर आपल्या उत्पादनांची विक्री सुरु केली आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल, बिग बास्केट, शॉपक्लूज, ग्रोफर्स अशा बड्या ई-कॉमर्स पोर्टलवर ही सर्व उत्पादने उपलब्ध आहेत.
 
 
 
याशिवाय पतंजली आयुर्वेदसाठी एक वेगळे पोर्टल तयार करून त्यावर देखील हि उत्पादने खरेदी करता येऊ शकणार आहे. हरिद्वार येथील ही कंपनी भारतीय बाजारपेठेत मोठ्याप्रमाणात प्रसिद्ध झाली आहे. त्याचबरोबर यातील दर्जेदार उत्पादनांनी अनेक विदेशी कंपन्यांचे धाबे दणाणून सोडले आहे.
 
 
अशी ही पतंजली उत्पादने बदलत्या बाजारपेठेनुसार जर एका क्लिकवर उपलब्ध होणार असतील तर खरेदीचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा बाजारपेठेतील अन्य उत्पादनांवर परिणाम होईल, असे देखील बोलले जात आहे.